Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
महाराष्ट्र संवाद विशेष

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

राज्यातील काँग्रेसचे होते एकमेव खासदार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 30, 2023Updated:May 30, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (वय 47 वर्ष) यांचे नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. धानोरकर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. चारच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ चार दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिता पुत्राच्या लागोपाठ झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे भद्रावती येथे झालेल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे वडिलांचे अंतिम विधी धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी केले होते. शनिवारी (27 मे) नागपूरच्या खाजगी रुग्णालयात खासदार धानोरकर यांच्यावर किडनी स्टोनचे शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर आतड्यात झालेल्या इन्फेक्शनमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी रविवारी (28 मे) पुढील उपचारासाठी नागपूरहून विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलविण्यात आले होते.

दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृतीत काही अंशी सुधारणा झाल्याचे सोमवारी समोर आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. धानोरकर यांचे पार्थिव एअर ॲम्बुलन्सने महाराष्ट्रात आणल्यानंतर उद्या वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

कोण होते धानोरकर…

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढले आणि जिंकलेही. राज्यातील ते काँग्रेसचे एकमेव खासदार होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 593
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

विहिरीत आढळलेल्या महिलेची ओळख पटली मृत्यूचे गूढ; पोलिसांकडून तपास सुरू

June 3, 2026

संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.