Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही लोकसेवा आयोगाचे अधिकारी घडतात: आ. बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही लोकसेवा आयोगाचे अधिकारी घडतात: आ. बाळासाहेब थोरात

माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालये यांची गुणवत्ता चांगली असल्याने आज याच शाळांमधून केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मंगेश पाराजी खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ व्या रँकने उत्तीर्ण होत यश मिळविले. याबद्दल आमदार थोरात यांच्या हस्ते तालुक्यातील सुकेवाडी येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे, माजी नगरसेवक व उद्योजक गोरख कुटे, सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाषराव कुटे, भागवत बाबा पतसंस्थचे अध्यक्ष सोपानराव कुटे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष गोरख सातपुते, दुधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, माजी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शिवाजी खूळे, दादासाहेब कुटे, भारत सातपुते, निखील पापडेजा, गौरव डोंगरे आदी उपस्थित होते.

सुकेवाडी परिसराचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे व वसंत लॉन्सचे संचालक गोरखशेठ कुटे पाटील यांनी चि.मंगेश यांचा कौटूंबिक सत्कार केला.

डॉ. तांबे यांनी मंगेशचे वडील चहा ठेला चालवतात तर आई विडी कामगार असतांना त्याने अतिशय मेहनतीने यश मिळविल्याबद्दल कौतुक केले. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्यालय यांना भविष्यात उत्तम भौतिक सुविधांसाठी एकजूट होऊन काम करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष विलास कुटे यांनी, सुत्रसंचालन सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी तर उपस्थितांचे आभार छावाचे कार्याध्यक्ष खंडू सातपुते यांनी मानले. यावेळी सुकेवाडी-खांजापूर परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,360
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.