महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कार्याध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड संगमनेर तालुक्यातील सांगवीचे रहिवासी असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत.
काँग्रेस पक्षाचा विचार ध्येयधोरणे यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गायकवाड यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली काम केले असून विविध योजना व विचारांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला आहे. या कामाची दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते व जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी यादव, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्या उपस्थितीमध्ये गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गायकवाड संगमनेर अकोले तालुक्यात अनेक वर्षापासून काम करत आहे. त्यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

