Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गिर्यारोहक सुविधा कडलग व रोटरी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर
सामाजिक

गिर्यारोहक सुविधा कडलग व रोटरी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

लातूरमध्ये होणार पारितोषिक वितरण सोहळा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2023Updated:12/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली.

याप्रसंगी जेष्ठ नेते सहकार महर्षी दिलीप देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पद्मश्री तात्याराव लहाने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील जवळे कडलग येथील व सध्या पुणे स्थित असलेल्या गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग यांनी आठ हजार ८४९ मीटर उंच असलेले जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. तर सामाजिक क्षेत्रात ऋषिकेश मोंढे यांनी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

युवा उद्योजक व रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे हे साई आशीर्वाद इंडस्ट्रीजचे संचालक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. रोटरी क्लब संगमनेरच्या माध्यमातून त्यांनी कोविड पश्चात पार्श्वभूमीवर संगमनेर अकोले तालुक्यातील ३७ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शालेय अभ्यासक्रम असलेले एक कोटी रुपयाचे ६६५ टॅब वितरित केले आहेत. कोरोना महामारीमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या १११ महिलांना आटा चक्की व ६१ महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. अंधत्व मुक्त समाज निर्मितीसाठी उपवर गरजू व गरीब मुलामुलींच्या ७१ तिरळेपणा निर्मूलन शस्त्रक्रिया रोटरी आय केअर ट्रस्ट संगमनेरच्या माध्यमातून केल्या आहेत.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी सक्षमपणे उभा राहण्यासाठी नांदूर खंदरमाळ येथे ५०० केशर आंबा, वड, चिंच यांचे तर जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एक एकर जागेत अधिक उत्पादन देणाऱ्या चिंचेची लागवड करून चिंचबन उभे केले आहे. कोरोना आपत्तीमुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोंढे यांनी दिलेल्या योगदानाची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,452
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.