Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, २३ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या राशिभविष्य

23/10/2026

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोल्हे साहेबांचा वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात : विवेक कोल्हे
राजकारण

कोल्हे साहेबांचा वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात : विवेक कोल्हे

गणेश कारखाना निवडणूक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

थोरात-कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक – करण ससाणे

तुम्हाला गाळप करता आले नाही म्हणून संगमनेर संजीवनी शेतकऱ्यांच्या मदतीला आले – सचिन गुजर

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहाता : सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, कोल्हे साहेबांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्यावतीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार बैठक घेतली. बैठकीत बोलताना त्यांनी या निवडणुकी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, सचिन गुजर, गणेशचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजीराव लहारे, सुरेश थोरात आदींसह बहुसंख्य सभासद, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, ‘अत्यंत संघर्षाच्या काळात कोल्हे साहेबांनी गणेश कारखाना चालवला. तब्बल 38 वर्ष त्यांनी कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे सभासद, शेतकरी आणि कामगारांमध्ये कोल्हे साहेबांबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे. कोल्हे साहेबांचा नातू म्हणून त्यांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे.‘

गणेश परिसरात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोल्हे साहेबांनी ताकद दिली. त्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मला आग्रह धरला. त्यांचा आग्रह आम्ही मोडू शकलो नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत ही निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनीच मांडली. महाराष्ट्रात सहकारात कधीच राजकारण आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो. आम्ही गणेश सक्षमपणे चालवू. जितका संगमनेर आणि संजीवनी आमच्यासाठी महत्त्वाचा तितकाच गणेशही महत्त्वाचा असेल, अशी ग्वाही या बैठकांमधून विवेक कोल्हे यांनी सभासद आणि कामगारांना दिली.

थोरात-कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक

करण ससाने म्हणाले, गणेश कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी थोरात आणि कोल्हे ही ब्रॅण्डेड युती आहे. बाळासाहेब थोरात यांनी राज्याला आदर्श ठरतील अशा प्रकारे सहकारी संस्था चालवल्या आहेत. त्यांचे नेतृत्व संयमी, निष्कलंक आणि प्रामाणिक आहे. त्यांनी राजकारण करताना कायम सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. विवेक कोल्हे यांनी अत्यंत कमी वयात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे, त्यामुळे मेहनती आणि अभ्यासू नेतृत्व श्री गणेश परिवर्तन मंडळाला लाभलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेशचा भविष्यकाळ उज्वल असेल.

तुम्हाला गाळप करता आले नाही म्हणून संगमनेर संजीवनी शेतकऱ्यांच्या मदतीला आले

सचिन गुजर म्हणाले, प्रवरेच्या नेतृत्वाने ऊर्जित अवस्थेत असलेला गणेश कारखाना आठ वर्षात खिळखिळा केला. योग्य वेळेत आधुनिकीकरण केले नाही, डिस्टलरी बंद ठेवली. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड मिळाली नाही. भाव कमी दिला, वेळेत शेतकऱ्यांचे देणे दिले नाही. राज्यात ऊस अधिक असताना गणेश कारखान्याला पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही. जर संगमनेर किंवा संजीवनीने ऊस नेला नसता तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस पेटवून द्यावा लागला असता. तुम्हाला कारखाना धड चालवता आला नाही, भाव देता आला नाही, म्हणून संगमनेर संजीवनीला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यावे लागले. प्रवरेच्या नेतृत्वाला गणेश चालवता येत नाही म्हणून पाणी असूनही शेतकऱ्यांनी ऊस लावणे बंद केले. प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश बंद करण्यासाठी सगळ्या उपाययोजना केल्या, हम करे सो कायदा हा त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठीच थोरात कोल्हे एकत्र आलेले आहेत. थोरात आणि कोल्हे हे दोघेही संस्था चांगल्या चालविण्यासाठी राज्यात ख्यातकीर्त आहेत, गणेश परिसरातील सभासद, कामगार, शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा माझा विश्वास आहे, असेही गुजर म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 347
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, २३ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या राशिभविष्य

By Annant Ppangarkar23/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आज तुमचे मन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात अधिक गुंतलेले राहील. समाजात…

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.