Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समनापुर-जोर्वे येथील दगडफेक, दंगल प्रकरण भोवले; तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणेची नगर कंट्रोलला रवानगी… प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे पदभार
महाराष्ट्र संवाद विशेष

समनापुर-जोर्वे येथील दगडफेक, दंगल प्रकरण भोवले; तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणेची नगर कंट्रोलला रवानगी… प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे पदभार

परिस्थिती नियंत्रणात येतात पोलीस अधीक्षकांनी टाकले पाऊल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/06/2023Updated:13/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे येथील आठ तरुणांवर झालेला प्राणघातक हल्ला, त्यानंतर त्याचे जोर्वे गावात उमटलेले पडसाद, शहरातील भगवा मोर्चा नंतर समनापुर गावात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर झालेली दगडफेक प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक ढुमणे यांची नगर कंट्रोलला तडकाफडकी महिनाभराच्या आतच बदली करण्यात आली आहे.

त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तीन महिन्यांसाठी सोपविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वमने यांनी तालुका पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली.

जोर्वे येथील तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यशस्वी ठरले. नव्यानेच पदभार घेऊन काही तास उलटत नाही तोच उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना देखील याप्रकरणी मोठी कसरत करावी लागली.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देखील संगमनेरमध्ये ठाण मांडावे लागले होते. परिस्थिती नियंत्रणात आले असली तरी त्याचे दूरगामी परिणाम पुढच्या आठवडाभरात दिसून आले.

जोर्वे नाका येथील घटनेनंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद जोर्वे गावात उमटले होते. यामुळे तालुक्यात असंतोष निर्माण होत होता. त्यानंतर या सर्व प्रकरणाची परिणती शहरातून भगवा मोर्चा काढण्यात झाली होती. हा मोर्चा संपल्यानंतर तालुक्याच्या पूर्व भागात परतणाऱ्या काही समाजकंटकांनी समनापुरमध्ये दगडफेक करत दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते तसेच घरात घुसून मारहाणीचा देखील प्रयत्न झाला. या प्रकारात तीन जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे दगडफेकीची ही घटना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर घडली होती. याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

या प्रकारातूनच ढुमणे यांची पोलीस अधीक्षकांनी नगर मुख्यालयात रवानगी केल्याचे बोलले जात आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात उपाधीक्षक वमने यांचा कार्यकाल संपल्यानंतर पोलीस अधीक्षक तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 991
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.