Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चपराकचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित
सामाजिक

चपराकचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित

संगमनेर येथील हिरालाल पगडाल यांचे ‘चिन्नण्णा’ हे आत्मचरित्र क्युआर कोड स्वरूपात प
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2023Updated:15/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणार्‍या ‘चपराक’ प्रकाशनने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नाशिक येथील युवा कवी आणि गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे.

सध्याचा आघाडीचा गायक गौरव चाटी यांनी ते आर्त आणि सुमधुर स्वरात सादर केले आहे. कोल्हापूरच्या प्रवीण ऐवळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पदार्पणातीलच या गीताला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशक आणि निर्माते घनश्याम पाटील यांनी सांगितले.

चपराक प्रकाशनने राज्यभरातील नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. 2002 सालापासून ‘साहित्य चपराक’ हे वाङमयीन मासिक प्रकाशित होते. या मासिकातील निवडक कथा, लेखांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ चपराकच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध करून दिल्याने हा ज्ञानसाठा दृकश्राव्य माध्यमात आला आहे. त्यासाठी भारतातीलच नाही तर अमेरिका, कॅनडा, ऑस्टे्रलिया, जर्मनी अशा अनेक देशांतील मराठी अभिवाचकांनी पुढाकार घेतला आहे.

विठु नाम या गाण्यानंतर केदार मांजरे आणि ज्योती घनश्याम यांचे ‘जीव नादावला’ हे प्रेमगीत श्रोत्यांच्या भेटीस येत आहे. शुभम भोसले यांनी हे स्वरबद्ध केले आहे. सध्या चपराकच्या युट्युब चॅनेलवर अनेक मान्यवरांचे कथा, कविता, लेख आणि अन्य विषयांवरील साहित्य नियमितपणे देण्यात येत आहे.

यापुढे गाण्यांचे अल्बम, शॉर्ट फिल्मस, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी अशा माध्यमातून मराठी लेखकांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.

संगमनेर येथील हिरालाल पगडाल यांचे ‘चिन्नण्णा’ हे आत्मचरित्र क्युआर कोड पुस्तकात प्रकाशित…

विविध पुस्तकांचे अभिवाचन करून त्याचे क्युआर कोड पुस्तकात प्रकाशित केल्याने चपराकची अनेक पुस्तके वाचण्याबरोबरच ऐकता आणि पाहताही येतात. कोकणातील ज्येष्ठ लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा’ या व्यक्तिचित्रणाचे पुस्तक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या निवृत्त अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे-गावडे यांचा ‘वाटले मला जे’ हा संग्रह, संगमनेर येथील हिरालाल पगडाल यांचे ‘चिन्नण्णा’ हे आत्मचरित्र आदी पुस्तकांना हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. तंत्रज्ञानाच्या सहायाने वाचकांना श्रवणाचा आनंद देणारी प्रकाशन संस्था म्हणून चपराकच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 511
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.