Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगी नदीच्या पुलासह रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर
राजकारण

म्हाळुंगी नदीच्या पुलासह रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर शहरातील विविध कामे मार्गी लागणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेरमधील बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पुलाच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी तसेच शहरांतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांना दिले होते. त्यानुसार वैशिष्ट्येपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषदांना वितरित करावयाच्या निधीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर आणि पंपिंग स्टेशन कडे जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी साडेचार कोटी रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत इंदिरा गार्डन आणि गार्डनचा दक्षिण व उत्तर बाजूचा परिसर सुशोभीकरण करणासाठी २० लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत लिंक रोड नाशिक-पुणे हायवे चौक सुशोभीकरण २० लाख, संगमनेर नगरपरिषद हद्दीतील भारत चौक सुशोभीकरण करणे १५ लाख, संगमनेर नगरपरिषद हद्दीत साई श्रद्धा चौक सुशोभीकरण करणे २० लाख रुपये.

संगमनेर नगरपरिषद हद्दीत कोल्हेवाडी रोड नाटकी नाल्यावर पूल बांधणे आणि सुशोभीकरण करणे ३० लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं. १५६ सखाहरी गुंजाळ यांचे खुल्या जागेत सुशोभीकरण कामासाठी १५ लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं१२४ (३७२) पे. मधील ओपन स्पेसमध्ये सुशोभीकरण कामासाठी १० लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत पावबाकी रोड दुतर्फा बाजूस फुटपाथ करून सुशोभीकरण कामासाठी ७० लाख रूपये.

संगमनेर नगर परिषद अलकानगर नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी ३० लाख रूपयांचा आणि संगमनेर नगरपरिषद हद्दीत कुरणरोडकडे जाणारा नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी २० लाख रूपये असा एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरात लवकर या विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 870
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.