महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे व उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख यांच्या सूचनेवरून या निवडी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये शितल सदाशिव हासे यांना महिला आघाडी तालुका संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
याशिवाय उज्वला कैलास गुळवे (महिला आघाडी तालुका संघटक, साकुर पठारभाग)
आशा संदीप केदारी (महिला आघाडी उपजिल्हा संघटक, संगमनेर-अकोले)
सुरेखा गुंजाळ (महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस)
सुनिता अशोक सातपुते (महिला आघाडी उप तालुका संघटक)
सोनाली रवी गिरी (महिला आघाडी उप तालुका संघटक)
संगीता गायकवाड (महिला आघाडी संगमनेर शहर संघटक)
अल्पना शाम तांबे (महिला आघाडी उप शहर संघटक)
बानोबी शौकत पठाण (महिला आघाडी उपशहर संघटक)
आशा पंढरीनाथ इल्हे (महिला आघाडी उपतालुका संघटक तळेगाव भाग)
यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे, शिवसेनेची ध्येयधोरणे जनसामान्यपर्यंत पोहोचवणे, शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त महिला आघाडींना समाविष्ट करून महिलांसाठी विविध योजनेचा लाभ देणे. महिला सबलीकरण सक्षमीकरण मोहीम राबविणे. महिलांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांनी काम करायचे आहे.

