महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले – अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवारी (ता.१८ जुन) सायंकाळी ५ वाजता श्रीरामपुर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटीत आयोजित केले असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे.
मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांचे अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.
या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले.

