महाराष्ट्र संवाद न्यूज | रविवार विशेष
आजच्या या तरूणी तरी
कुठे आहेत हो… ध्यानावर
कायम पडीक पडलेल्या
फेसबुक, इन्स्टाग्रामवर
घालून टिचभर कपडे
मोकाट फिरती गावभर
दाखवून… अंगप्रदर्शन
सेल्फी काढती ढीगभर
काँलेजच्या नावाखाली
पोरांसोबत जाती डेटवर
उघड्या बोडक्या होऊन
हुदंडती खुशाल बीचवर
कुणाचं काही ऐकत नाही
जुमानत नाही आईबापाला
म्हणे आमची लाईफ स्टाईल
तुमी मधे पडता कशाला !
क्षणभंगुर सुखासाठी पोरी
लागती कुणाच्याही नादाला
आंधळ्या प्रेमापायी बावळ्या
मुकतात कायमच्या जीवाला
बाँयफ्रेंन्ड, गर्लफ्रेंड ट्रेडच्या
नावाखाली चाललाय धिंगाणा
जाणती असो वा अजाणती
बळी पडत आहे भोगांना…
संस्कार, संस्कृती विसरून
चालल्या वाहवत विनाशाला
सगळ्याचं नाही पण बहुतेक
लागल्यात वाईट वळणाला …
दोष नाही एकट्या मुलांचा
मुलीही नाहीत काही कमी
कुणासोबत जातील…पळून
याची राहिली ना आता हमी …
©® सौ. मीना शेळके (शब्दवेडी मिनू),संगमनेर


