महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी आनंद हासे, सेक्रेटरीपदी मधुसुदन करवा तर डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे.
रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. क्लबच्या सन २०२३-२४ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये अमित पवार, महेश वाकचौरे, ऋषिकेश मोंढे, दिपक मणियार, डॉ. प्रमोद राजुस्कर, ओंकार सोमाणी, सुनिल कडलग, संजय लाहोटी, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, प्रमोद मणियार, दिलीप मालपाणी, भुषण नावंदर, मयुर मेहता, अजित काकडे, संजय राठी, मोहित मंडलिक, पवनकुमार वर्मा, रविंद्र पवार, सौरभ म्हाळस, विश्वनाथ मालाणी, डॉ. किशोर पोखरकर, नरेंद्र चांडक, योगेश गाडे, संदिप फटांगरे, सुनिल घुले, संजय कर्पे, महेश ढोले यांचा समावेश आहे.
१९८४ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब संगमनेर या संस्थेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटवत मागील वर्षी क्लबतर्फे गरजू विद्यार्थ्यांना ६५० शैक्षणिक टॅबचे मोफत वितरण, प्रोस्थेटिक हँड, जयपूर फुट याचे मोफत वितरण, तसेच मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया, सुमारे सुमारे २००० मोठी झाडे लावून ती जगविणे तसेच कोरोना काळात गरजू महिलांना मोफत १११ आटा चक्की तसेच ६५ शिलाई मशिन वाटप असे समाजोपयोगी प्रकल्प राबविले आहेत.
रोटरी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून १९८९ पासून क्लबने ३२ हजारांपेक्षा जास्त मोफत मोतिबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया करुन त्याद्वारे आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे.
नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवारी (१६ जुलै) मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सत्यजित तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी असिस्टंट गव्हर्नर क्षितीज झावरे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

