Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंढरीचा चोर
सामाजिक

पंढरीचा चोर

आषाढी एकादशी निमित्ताने विशेष लेख
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 29, 2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्र धर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे विठ्ठल.

ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले. कसे ते सांगत आहेत निरेन आपटे!

ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे:

“घटाघटांचे रूप आगळे

प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविना ते कोणा नकळे.

मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!

विठ्ठला, तू वेडा कुंभार!”

प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो.

विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा

वेदानाही नाही कळला अंतपार यांचा” असही झालं.

कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचा अंतपार लागत नाही. तो अनादी, अनंत आहे.

एकूणच विठ्ठल अनेक युगे पुतळा चैतन्याचा बनून उभा ठाकला आहे. ज्याने अनेकांना विविधरंगी, विविध अंगी दर्शन दिलं आहे.

एकनाथ लिहितात,

“काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल”

खूप मोठा अर्थ आहे या ओळीत.

पंढरी म्हणजे नुसतीच जमलेली गर्दी. अगदी शरीराच्या अवयवांसारखी. नुसता कलकलाट, नुसता गोंगाट.

एक एक अवयव, हळूहळू निघून गेला की गर्दी संपते. शेवटी काहीच उरत नाही.

मग विठ्ठल कुठे आहे?

एकनाथ उत्तर देतात…. आत्मा हा विठ्ठल!

शेवटी जो उरतो तो आत्मा, विठ्ठल!!

शरीर नष्ट होईल पण आत्मा अटळ विठ्ठल अमर आहे असा धीरही एकनाथ देतात.

तसा विठ्ठल सावळा आहे; पण त्यातही अनेक रंग आहेत, त्याची रूपेही खूप आहेत. त्याचं वेगळं रूप दिसलं सावता माळी ह्यांना.

सावता माळी आपल्या मळ्यात दिवसरात्र राबत असत. त्यांच्या मळ्याजवळून अनेक लोक पंढरपूरला जात असत. एकदा एक जण सावता माळींना म्हणाला- आम्ही नेहमी उपास-तापास करून पंढरपूरला अनवाणी जातो, तू कधीच का येत नाहीस.

सावता माळींनी उत्तर दिलं-

‘कांदा-मुळा-भाजी।

अवघीं विठाबाई माझी॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी।

अवघा झाला माझा हरीं॥’

सावता माळी बी पेरत असत. उन्हातान्हात उभे राहून त्याला पाणी घालत असत आणि मग ते बी तरारून बाहेर येई. लसूण, मिरची, कोथिंबिरी हेच हरीसारखे प्रसन्न होत असत.

साक्षात विठ्ठल सावता माळींसमोर उभा राही!!

सावता माळींनी मनगट वापरलं, ते कर्म करत राहिले, मग विठ्ठलाने त्यांना दर्शन देण्याचं स्वतःच कर्म – स्वतःच कर्तव्य पार पाडलं.

इथे पुन्हा शब्दप्रभू ग. दि. मा. आठवतात. त्यांनी लिहिलं आहे :

जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम

तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम

दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी!

नसे राउळी वा नसे मंदिरी

जिथे राबती हात तेथे हरी!

जे सावता माळींनी सांगितलं तेच माडगूळकर वेगळ्या शब्दात सांगतात.

भूमिपुत्राने घाम गाळला तर स्वतः श्याम म्हणजे देव येऊन उभा राहील. जिथे हात राबतील, तिथे हरी येईल.

विठ्ठल अनेकांना अनेक रूपात दिसला आणि महाराष्ट्रात फार मोठी संतपरंपरा उभी राहिली.

संत कान्होपात्रा, सेना महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई, निवृत्तीनाथ आणि अनेक ज्ञात-अज्ञातांनी विठ्ठलाला पाहिले.

नरहरी सोनारांनी देवाचे वर्णन करताना म्हटले,

“देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार”

इथे नरहरी आणि कबीर ह्यांच्यातील साम्य दिसते. कबीर म्हणत असे की मी वस्त्र विणतो तेव्हा राम म्हणतो. नरहरीही आपली प्रत्येक कृती देवासाठी करत राहिले. तोच धागा पकडून पी. सावळाराम ह्यांनी गीत रचले,

“धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया”

जनाबाईंनी म्हटले,

हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला

गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर

कृष्ण लोणी चोरून मित्रांना वाटत असे. विठ्ठलाचंही वर्णन करताना जनाबाईंनी”चोर” म्हटले आणि मराठी भाषेची प्रतिभा पहा, हा चोर लोकांना आवडला.

सोहिरोबानाथ ह्यांनी लिहिले:

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।

तेथ कैचि दिवस-राती।

तयावीण नेत्रपाती हलवू नको रे!

हरिभजनाविण काळ घालवू नको रे.

ज्ञानजोतीविना नेत्रपातीही हलवू नकोस असं त्यानी सांगितलं.

आणि बहिणाबाईंनी देवावर भाष्य केलं नसतं तरच नवल. अंधश्रद्धेतून देव संकल्पनेला मुक्ती देताना त्या म्हणतात:

“बापा नको मारू थापा

असो खऱ्या, असो खोट्या

नहि नशिब नशिब

तया हाताच्या रेघोट्या

नको नको रे जोतिष्या

नको हात माझा पाहू

माझं दैव मला कये

माझ्या दारी नको येऊ

अनेकांनी देव ही संकल्पना कर्मवादाशी जोडली.

महाराष्ट्रात देवाला दगडातून बाहेर काढणारी परंपरा उभी राहिली.

कवी बोबडे यांनी स्वतःमधला देव दाखवण्यासाठी लिहिले:

सागर पोहत बाहू बळाने।।

नाव तयास… मिळो न मिळो रे ॥१॥

स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥

तदगृही दीप… जळो न जळो रे ।।२॥

जो करी कर्म अहेतू निरंतर ॥

वेद तयास… कळो न कळो रे ॥३॥

ओळख पटली ज्यास स्वतःची ॥

देव तयास… मिळो न मिळो रे ॥४॥

जो स्वतःच्या हाताने पोहत जाईल त्याला नाव मिळाली नाही तरी चालेल. जो स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित आहे त्याच्या घरात दीप नसला तरी चालेल. जो निरंतर कर्म करतो त्याला वेद कळले नाही तरी चालेल आणि ज्याला स्वतःची ओळख पटली आहे त्याला देव मिळाला नाही तरी चालेल.

विठ्ठल तर आपल्या आत आहे. त्याला चोरून देवालयात बंद करण्याइतका पुण्यवान कोण आहे?

माडगूळकरांनी लिहिले आहे,

देव देव्हाऱ्यात नाही. देव नाही देवालयी.

त्याला चोरून नेई, अशी कोणाची पुण्याई.

पुढे ते लिहितात,

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे

देव आपणात आहे, शीर झूकोनिया पाहावे.

देव इतका सोपा आहे, सुलभ आहे. बस स्वतःमध्ये पाहिला की सापडतो.

…आषाढी एकादशीनिमित्ताने आरोग्यदायी शुभेच्छा..!

(साभार समाज माध्यम)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 335
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.