Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनुकरणीय… पुनम ओहरा यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना केले केस दान; कर्तव्यम फाउंडेशनचा उपक्रम
सामाजिक

अनुकरणीय… पुनम ओहरा यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना केले केस दान; कर्तव्यम फाउंडेशनचा उपक्रम

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको असं असताना देखील संगमनेर येथील पुनम तुषार ओहरा यांनी आपले केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले. कर्तव्यम फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करण्यात आला आहे.

ओहरा या कर्तव्यम फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष तुषार ओहरा यांच्या पत्नी आहेत. त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देत आहे. त्यांना सामजिक कार्याची आवड आहे. त्या सोशल मिडीयावर सोशल ॲक्टीव्हीटीचे व्हिडीओ बघत असताना त्यांना एक व्हिडीओ दिसला की, ज्यात एक मुलगी आपले संपुर्ण केस हे कॅन्सर पिडीतासाठी दान करते. त्यात त्या संस्थेचे नावं सुद्धा होते.

पुनम यांनी याबद्दलची सर्व माहिती काढत ठरविले की, आपन सुद्धा कॅन्सर पिडीतांना फुल न फुलाची पाकळी अशी मदत करु. त्यांनी यानंतर या संस्था प्रमुखांशी संवाद साधला. कॅन्सरच्या या आजारामुळे ज्या व्यक्तींचे केस जातात त्यांना कृत्रिम केस लावले जाऊ शकतात, त्यासाठी केस दान केले जाऊ शकतात, असं त्यांना कळालं. ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या डोक्यावरील केस दान करण्याचा निर्णय घेतला.

ज्या वयात मुली आपलं सौंदर्य जपतात, त्याच वयात त्यांनी आपल्या सौंदर्याचा विचार न करता आपले केस दान केले. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. एके दिवशी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत असताना कॅन्सरग्रस्त रुग्णांचे हाल मला बघावले गेले नाही. त्यामुळे माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मी कॅन्सरग्रस्ताना माझे केस दान केले आहे…. पुनम ओहरा, संगमनेर

कर्तव्यम फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्य करत असते. माझी पत्नी पुनम हिने कॅन्सरग्रस्तांना केस दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे यापुढे आता कॅन्सरग्रस्तांसाठी कर्तव्य फाउंडेशन काम करेल…. तुषार ओहरा, संस्थापक – कर्तव्यम फाउंडेशन, संगमनेर.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 768
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.