महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – येथील संगमनेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, स्वरसंगम संगीत प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. देशमुख यांच्या पत्नी सौ. सुरेखा (वय ८२) यांचे नासिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
संगमनेर शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रीय पुढाकार असायचा.
त्यांच्या पश्चात नासिक येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, अमेरिका स्थित कन्या माधवी मराठे आणि पती प्रा. डॉ. डी. एम. देशमुख असा परिवार आहे. 

