Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या सहकारी पतसंस्थेतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर, दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अध्यक्षासह नातेवाईक, व्यवस्थापक आणि चीफ अकौंटन्टने पतसंस्थेतील ठेवीदारांचे सुमारे ८१ कोटी रुपये लाटले
गुन्हेगारी

संगमनेरच्या सहकारी पतसंस्थेतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर, दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अध्यक्षासह नातेवाईक, व्यवस्थापक आणि चीफ अकौंटन्टने पतसंस्थेतील ठेवीदारांचे सुमारे ८१ कोटी रुपये लाटले

आता लक्ष पोलिसांच्या कारवाईकडे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बहुचर्चित अपहारप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चौघे अटकेत, अनेक जण गायब, पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

संगमनेरच्या दिशादर्शक सहकारावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सहकारातील बहुचर्चित ठरलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अखेरीस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील नावाजलेली आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरच्या सहकारावर प्रश्नचिन्ह: या प्रकरणात नाशिकच्या सनदी लेखापालानेही सहकार्य केल्याने त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये बड्या राजकीय नेत्यासह त्याच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने पोलीस त्यांना अटक करतात की जामिनासाठी संधी देतात हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान या प्रकारामुळे संगमनेरच्या दिशादर्शक सहकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे आहेत आरोपी: आरोपीमध्ये भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांच्या परिवारातील दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे (सर्व रा. गणपतीमळा, सुकेवाडी, संगमनेर) यांच्यासह भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर), चेतन नागराज कपाटे (रा. पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के. बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांचा समावेश आहे.

यांना झाली अटक: यापैकी लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी मात्र पसार झाल्याचे समजते.

गुन्हे दाखल करण्यास गेल्या आठवड्यात परवानगी: सुमारे दोन वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरणाची चर्चा सुरु होती. सतर्क सभासद, ठेवीदारांचे विविध प्रकारचे आंदोलन, निवेदने यामुळे दूधगंगा अपहार प्रकरण शहरासह तालुक्यात चर्चेत होते. आरोप प्रत्यारोप आणि आश्वासने यांची देवाण-घेवाण चालू होती. राजकीय दबावामुळे कायदेशीर कारवाई मात्र होत नसल्याचीदेखील चर्चा होती. मात्र गेल्या आठवड्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शासकीय परवानगी मिळताच नगरचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी शनिवारी मध्यरात्री दिलेल्या फिर्यादीवरुन पतसंस्थेच्या ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, कर्जदार आणि त्यांना मदत करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीतील हा गुन्हा घडल्याचे म्हटले आहे.

या कलमान्वये कारवाई: शहर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०८, ४०९, ४६५, ४६७, ४७१, ४७७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,442
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.