Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा: तिघा रोखपाला सह लेखा परीक्षकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी; ठेवीदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे निरीक्षकांचे आवाहन
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा: तिघा रोखपाला सह लेखा परीक्षकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी; ठेवीदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे निरीक्षकांचे आवाहन

अध्यक्ष, व्यवस्थापकाच्या घरावर पोलिसांचे छापासत्र, आक्षपार्ह कागदपत्रांची पडताळणी सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर मधील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक, चीफ अकाउंटंटसह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली. अटक केलेल्या चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने सहा दिवसांची (24 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

छापा सत्रात कागदपत्रांची पडताळणी सुरू: बँकेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह अन्य आरोपी पसार झाले असून पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान सकाळपासून पोलिसांच्या चार पथकांनी अध्यक्ष कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्या घरी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. आक्षपार्ह आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी भगवान मथुरे यांनी दिली.

21 आरोपी: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन 2016 ते 2021 पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 408, 409, 465, 467, 471, 477-A नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तिघांना संगमनेर मधून तर एकाला नाशिक मधून अटक: अध्यक्ष त्यांच्या नातेवाईकासज व उर्वरीत आरोपी फरार झाल्याची माहिती देण्यात आली. तर पोलिसांच्या तीन पथकांनी रात्रीतून संगमनेरमधून लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांना तर अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षकाला नाशिकमधून अटक केली.

अपहारास सहाय्य: अटक केलेल्या या चौघांसह आणखी एक वैधानिक लेखापरीक्षक अरुण बुरड आणि रोखपाल उत्तम शंकर लांडगे यांना संस्थेत होत असलेल्या गैरप्रकाराची माहिती होती. या सहा जणांनी उर्वरित सतरा जणांना संस्थेच्या निधीचा अपहार केल्यास सहाय्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हे आहेत मुख्य आरोपी: भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र (सोनाली दादासाहेब कुटे), अमोल ट्रेडिंग कंपनी (दादासाहेब भाऊसाहेब कुटे), श्री डेव्हलपर्स (संदीप भाऊसाहेब कुटे), कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम, संदीप दगडू जरे या सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून याप्रकरणी त्यांना सहा आरोपींनी मदत केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

… पोलिसांनी ठेवीदारांना केले महत्त्वाचे आवाहन…

दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी ठेवीदारांना या संदर्भात आवाहन केले असून संस्थेच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची माहिती कागदपत्रासह पोलिसांना द्यावी. या माहितीचा उपयोग आरोपी विरोधात पुरावा म्हणून केला जाणार आहे. यामुळे नेमक्या किती ठेवेदारांच्या ठेवी संस्थेत अडकल्या याचीही माहिती समोर येणार असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,955
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.