Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घातक हत्याराने दुखापत आणि सदोष मनुष्यवधाबद्दल संगमनेरच्या न्यायालयाने आरोपीला दिली ही शिक्षा…
न्यायालय

घातक हत्याराने दुखापत आणि सदोष मनुष्यवधाबद्दल संगमनेरच्या न्यायालयाने आरोपीला दिली ही शिक्षा…

साडेसहा वर्ष सुरू होता खटला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2023Updated:28/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेर – चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पहारीने मारहाण करीत तिचा खून करणाऱ्या आणि तिला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या व्यक्तीला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या आरोपीला झाली शिक्षा: बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा. लक्ष्मी नगर, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी खून आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्य वधाच्या तसेच घातक हत्याराने दुखापत करण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

काय होती घटना: १३ ऑक्टोंबर २०१६ रोजी आरोपी बाळासाहेब तुळशीराम फटांगरे याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या राहत्या घरी पत्नी वैशाली उर्फ छाया बाळासाहेब फटांगरे (वय ३५ वर्ष) हिला घरातील लोखंडी पहारीने मारहाण केली. मारहाण होते वेळी भानुदास लालू गुंजाळ हे दोघांचे भांडण मिटविण्यासाठी गेले असता याचा राग आल्याने आरोपीने त्यांना देखील लोखंडी पहारीने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यांनी केला तपास: पती बाळासाहेब फटांगरे यांनी केलेल्या मारहाणीत पत्नीचा वैशाली उर्फ छाया हिचा मृत्यू झाला होता. तर भानुदास गुंजाळ यांना डोक्यात पहार मारल्याने ते जखमी झाले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बाळासाहेब फटांगरे याच्या विरोधात सदोष मनुष्यवध आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक फौजदार विजय सरवदे आणि पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी याप्रकरणी तपास केला होता. आरोपी विरोधात शहर पोलिसांनी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या न्यायालयासमोर झाली सुनावणी: या खटल्याची सुनावणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील जयंत दिवटे यांनी काम बघितले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे, नयना पंडित व प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

एवढ्या साक्षीदारांची तपासणी: न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादीसह मारहानीत जखमी झालेल्या भानुदास गुंजाळ, प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

दोषी ठरवत ठोठावली शिक्षा: सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बाळासाहेब फटांगरे याला दोषी ठरवत भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३०४ अन्वये दोषी ठरवत सात वर्षं सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची तसेच भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३२६ अन्वये दोषी ठरवत सात वर्षं सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. संगमनेर शहरालगत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,219
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.