Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा नागरी पतसंस्था 81 कोटीचा अपहार; पोलीस तपासावर संशयाची सुई, न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी होणारा विलंब आरोपींच्या पथ्यावर…
गुन्हेगारी

दूधगंगा नागरी पतसंस्था 81 कोटीचा अपहार; पोलीस तपासावर संशयाची सुई, न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी होणारा विलंब आरोपींच्या पथ्यावर…

दूधगंगा नागरी पतसंस्था तपास रेंगाळला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपी अद्यापही बाहेरच!

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शेकडो ठेवीदारांच्या कष्टार्जित 81 कोटींच्या ठेवींना चुना लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे संगमनेरच्या विश्वासार्ह सहकार विश्वाला मोठा धक्का पोहोचला आहे. 81 कोटी रुपयांचा अपहार हा दोन राजकीय कुटुंबीयांभोवती केंद्रित झाला असून ठेवीदारांच्या ठेवीतून वाहणाऱ्या दूध गंगेत हात धुवून घेणाऱ्या, राजकीय वरदहस्त असलेल्या व जिल्हा परिषदेसह संगमनेरातील अन्य संस्थांमध्ये पदाधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपींपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नसल्याने पोलीस तपासाबद्दल संशयाची सुई निर्माण होताना दिसत आहे.

पाच आरोपींच्या अटकेनंतर अटक सत्र थांबले: गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने आणि तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सुरुवातीलाच पाच आरोपींना अटक केली होती. तसेच या अपहार प्रकरणातील मास्टरमाइंड, राजकीय पुढारी भाऊसाहेब कुटे याच्या घराची झाडाझडती घेत काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

खबर लीक आणि मास्टर माईंडसह अन्य आरोपी फरार: दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल होत असताना याची कुणकुण मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला लागल्याने तो कुटुंबीयासह फरार झाला असल्याचे समोर आले होते. गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यातूनच लीक झाल्याने आरोपींना पसार होण्याची संधी मिळाली. आरोपीची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला तत्परतेने माहिती पुरविली गेली असल्याची चर्चा होती. कुटेसह संस्थेत अपहार करणाऱ्या नातेवाईक टोळीच्या मागावर तपास अधिकारी मथुरे यांनी पोलीस पथके देखील तैनात केली होती.

गुन्हा वर्ग झाला आणि तपास अडकला: अटक केलेले आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला आणि येथेच माशी शिंकली असल्याचे बोलले जाते. दरम्यानच्या कालावधीत 24 ऑगस्टला कुटे याने कुटुंबीयांसह संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात 2 स्वतंत्र अटकपूर्व जामीन अर्ज ॲड. एस. यु. कवडे यांच्यामार्फत दाखल केले होते. त्यानंतर न्यायालय वैद्यकीय रजेवर असल्याने सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या तारखेवेळी देखील सरकार पक्षाने आपले म्हणणे सादर केले नाही. न्यायालयाने आरोपीपैकी कुटे कुटुंबाने दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्जाबाबत प्रस्तुत प्रकरणाची सुनावणी होऊन आदेश होई पावतो अर्जदार आरोपींना अटक न करण्यासंबंधी आदेश दिले आहे.

कुटे कुटुंबीयांना दिलासा अन्य आरोपींचे काय: कुटे कुटुंबीयांना आठ तारखेपर्यंत दिलासा मिळाला असला तरी अन्य आरोपींपर्यंत पोलीस अथवा तपास अधिकारी अद्यापही पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे पोलीस अप्रत्यक्षपणे आरोपींना मदत करत असल्याची चर्चा सुरू आहे. आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने आणि या अपहार प्रकरणाचा मुख्य मास्टर माईंड संस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्याच्या आणि राहुरी तालुक्यातील कदम कुटुंबीय आणि संस्थेच्या मॅनेजर भोवती हा घोटाळा केंद्रित झाला आहे. मॅनेजरचा अपवाद वगळता उर्वरित 14 प्रमुख आरोपी अद्यापही पोलिसांना पकडता आलेले नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या 81 कोटी रुपयांना चुना लावणारी ही टोळी पकडण्यात पोलीस यशस्वी ठरणार का? ठेवीदारांना न्याय मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,209
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.