Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉक्टरांच्या रुग्णालयास संलग्न असणाऱ्या बंद घरातून चोरट्याने लांबविले तब्बल अर्धा किलोचे दागिने… रुग्णालय परिसरात चोरट्यांची नजर
गुन्हेगारी

डॉक्टरांच्या रुग्णालयास संलग्न असणाऱ्या बंद घरातून चोरट्याने लांबविले तब्बल अर्धा किलोचे दागिने… रुग्णालय परिसरात चोरट्यांची नजर

तब्बल 16 लाखाचे दागिने चोरीस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – नवीन नगर रस्त्यावर असलेल्या हृदयरोग तज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक वजनाचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर सावंत यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

गॅलरीतून प्रवेश: सावंत यांचे नगर रोडवरील ताजने मळ्यात ‘साई सुमन हृदयालय व क्रिटिकल केअर सावंत हॉस्पिटल’ आहे. या रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सावंत आपल्या कुटुंबासह राहावयास आहे. अज्ञात चोरट्याने हॉस्पिटल वरील गॅलरीतून घरात प्रवेश केला आणि तब्बल अर्धा किलो वजनाचे दागिने चोरून नेले.

बाहेरगावी गेल्याची संधी साधली: शनिवारपासून (2 सप्टेंबर) डॉ. सावंत कुटुंबीय बाहेरगावी गेलेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीतून घरात प्रवेश मिळविला. घरातील वस्तूंची-सामानाची उचकापाचक करत चोरट्याने कलकत्ता मंगळसूत्र, कॉलर नेकलेस, पॅण्डल, राधेय नेकलेस, स्टड इयर रिंग्स, गळ्यातील चैन, गळ्यातील वाट्या, मणी व सोन्याचे कॉइन असा पोलीस दप्तरी नमूद करण्यात आलेला 15 लाख 78 हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

गुन्हा दाखल: बाहेर गावाहून परतल्यानंतर सावंत कुटुंबियांच्या हा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर डॉ. सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तपास: संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दागिने चोरीचे सत्र सुरू असतानाच आता डॉक्टरच्या घरातून तब्बल अर्धा किलो वजनाचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार समोर आल्याने दागिने चोर शोधण्याचे आव्हान शहर पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,028
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्या मर्जीनुसार आणि आनंदात जाईल. सरकारी किंवा खाजगी…

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

20/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.