Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या बसमध्ये चढताना महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची अंगठी… तर त्याचवेळी व्यापाऱ्याचे सहा हजार रुपये लांबविले
गुन्हेगारी

नाशिकच्या बसमध्ये चढताना महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची अंगठी… तर त्याचवेळी व्यापाऱ्याचे सहा हजार रुपये लांबविले

दागिने चोरीच्या सर्वाधिक घटना बसस्थानकामध्ये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पोलिसांच्या नावाने टीका होत असताना बस स्थानकावरील सुरक्षारक्षक नेमके करतात काय?

एसटी प्रशासनच चोरीच्या घटनांना कारणीभूत…

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राज्यातील सर्वात मोठ्या आणि एअरपोर्टचा लूक असलेले संगमनेरचे बसस्थानक दागिने आणि रोकड चोरांसाठी सॉफ्ट टारगेट ठरले आहे. बस स्थानकावरील सातत्याने घडणाऱ्या दागिने, रोकड चोरीच्या घटनांमुळे बस स्थानक प्रशासन आणि येथील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या या घटनांना एसटी प्रशासनच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

सर्वाधिक घटना बस स्थानकात: दागिने चोरीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक घटना बस स्थानकामध्ये घडल्या आहेत. रविवारीदेखील (17 सप्टेंबर) बस स्थानकामध्ये दागिने आणि रोकड चोरीच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे एकाचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिन्यांचा डबा तर एका व्यापाऱ्याच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. विशेष म्हणजे काळजी घेऊन देखील चोरीच्या या घटना घडत आहेत. यासंदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दागिने लांबविले: दिपाली सचिन पाटील (रा. अमृतधाम, पंचवटी, नाशिक) ही महिला शनिवारी नाशिक येथून अकोले तालुक्यातील गिरगाव येथे आपल्या माहेरी आली होती. रविवारी (17 सप्टेंबर) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही महिला संगमनेर बस स्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना बस भोवती असलेल्या गर्दीचा फायदा घेत कोणीतरी या महिलेला धक्का दिला. त्यामुळे ही महिला बस मध्ये न चढता पुन्हा खाली उतरली.

दागिन्यांची डबी गायब: आपल्या जवळील पर्सची चैन उघडी असल्याचे खाली उतरलेल्या महिलेच्या लक्षात आल्याने तिने पर्स उघडली असता पर्समध्ये ठेवलेली दागिन्यांची डबी गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. चोरीच्या भीतीने या महिलेने आपल्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र आणि तीन तोळ्याची अंगठी एका डबीमध्ये ठेवत ती डबी स्वतः जवळील पर्समध्ये ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी तिच्या पर्समधील डबीच लांबविली असल्याचे दिसून आले. पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

व्यापाऱ्याचा खिसा कापला: दुसऱ्या घटनेत याचवेळी नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना व्यापाऱ्याचा खिसा कापण्यात आला. मारळगाव (कल्याण) येथील व्यापारी रामचंद्र रहेदोमल रोरा हे व्यापारानिमित्त संगमनेरला आले होते. ते नाशिकला जाण्यासाठी नाशिकच्या बसमध्ये चढत असताना गर्दीत कोणीतरी त्यांच्या खिशात हात घातल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी बसमध्ये न चढता खाली उतरून घेत खिशातील पैसे तपासले असता खिशातून सहा हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. याप्रकरणी देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 714
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.