Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस एका खून प्रकरणाचा उलगडा करायला गेले आणि पकडलेला आरोपी निघाला दोघांचा मारेकरी…
गुन्हेगारी

पोलीस एका खून प्रकरणाचा उलगडा करायला गेले आणि पकडलेला आरोपी निघाला दोघांचा मारेकरी…

दोन खून प्रकरणांचा झाला उलगडा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 27, 2023Updated:September 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पकडलेल्या आरोपीकडून दोन खुनाचा उलगडा; पीडित मुलीसोबत पैशासाठी आईचीही हत्या केल्याचे निष्पन्न

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेरमधील जुन्या आणि निर्जन असलेल्या चंदनापुरीच्या घाटात 24 सप्टेंबरला एका अल्पवयीन मुलीचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्राथमिकदृष्ट्या घातपात असल्याचे स्पष्ट करणाऱ्या या घटनेत पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान असताना अवघ्या काही तासात पोलिसांनी केवळ मृत मुलीची ओळखच पटविली नाही तर आरोपीदेखील गजाआड केला. यातील कौतुकास्पद बाब म्हणजे आरोपीने एक नव्हे तर दोन खून केल्याची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

दारू पाजून अल्पवयीन मुलीची हत्या:  अल्पवयीन पीडित मुलीची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याने या मुलीचा चेहरा विद्रूप झाला होता. त्यामुळे तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र पोलीस यंत्रणेने मेहनतीने तपास करत या मुलीची ओळख पटविली. यासाठी पोलिसांनी तीन पथकांची नियुक्ती केली होती. संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयासमोर राहणाऱ्या निर्मला राजेंद्र कदम या मुलीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

चौघे ताब्यात घेतले मारेकरी निघाला वेगळाच: या खून प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असतानाच पोलीस तपासाची दिशा अन्य एका आरोपीकडे गेली. ही पीडित मुलगी एका संस्थेचा बरोबर दुचाकीवरून गेल्याचे सीसीटीव्ही द्वारे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तुषार विठ्ठल वाळुंज (वय 25 वर्ष, रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पीडित मुलीला दारू जुन्या चंदनापुरी घाटात नेत तिची हत्या केल्याचे कबूल केले.

आरोपीने आईचीही केली हत्या: आरोपीकडे पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली असता त्याने नऊ महिन्यांपूर्वी स्वतःच्या आईची पैशासाठी हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या दुसऱ्या प्रकरणाचे फाईल आता उघडली गेली. सखुबाई विठ्ठल वाळुंज यांनी नऊ महिन्यांपूर्वी जानेवारीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र आता आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळाले आहे.

गळफास घेतल्याचे भासविले: आरोपी वाळूजला दारू पिण्याचे व्यसन असून त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. तर आई रोजनदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आरोपीने आपल्या व्यसनासाठी आईकडे जानेवारीमध्ये पैशाची मागणी केली होती. आईने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आईची गळफास देऊन हत्या केली. आणि तिने गळफास घेतल्याचे भासविले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

यांनी केला तपास: संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सालोमान सातपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरे, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्यातील गवळी, शिरसाठ, कुऱ्हे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,367
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.