Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला न्यायालयाने दिली ही मोठी शिक्षा!
गुन्हेगारी

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला न्यायालयाने दिली ही मोठी शिक्षा!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – भूखंड व्यवहारापोटी अनामत म्हणून आरोपीला तक्रारदाराने पाच लाख रुपये दिले. मात्र नंतर सदर भूखंडाचा व्यवहार न झाल्याने आरोपीने तक्रारदाराला त्या व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावला आहे.

प्रकाश प्रभू अरगडे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रशांत चंद्रकांत डहाळे यांनी यासंदर्भात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांच्यासमोर झाली. डहाळे यांच्यावतीने ॲड. सैफुद्दीन शेख यांनी ॲड. संजय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली काम बघितले.

मजुरीचे काम करणाऱ्या प्रशांत डहाळे यांना प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करावयाचे होते. ही बाब ओळखीतून त्यांनी आरोपी प्रकाश प्रभू अरगडे याला सांगितले. अरगडे याने त्याच्या घरासमोर असलेल्या मीरा हॉटेलजवळ सुकेवाडी (ता. संगमनेर) येथे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे डहाळे यांना सांगितले होते. तसेच या संदर्भातील व्यवहार करून देण्याचे अरगडे याने कबूल केले होते.

अरगडे याने दाखविलेला प्लॉट डहाळे यांना पसंत पडल्याने त्यांनी यासंदर्भात अरगडे याला मूळ मालकाशी व्यवहाराची बोलणी करण्यास सांगितले. डिसेंबर 2020 मध्ये डहाळे यांना प्लॉटच्या व्यवहारापोटी अॅडव्हान्स म्हणून पाच लाख रुपयाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यामुळे डहाळे यांनी अरगडे यास डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच लाख रुपये दिले. तसेच उर्वरित रकमेची व्यवस्था करण्यास डहाळे यांना सांगितले. डहाळे यांचा अरगडे याच्यावर विश्वास असल्याने त्यांनी या संदर्भात कोणताही करारनामा केला नाही.

उर्वरित रकमेची व्यवस्था झाल्यानंतर व्यवहार निश्चित करू असे अरगडे याने डहाळे यांना सांगितले. त्यानंतर डहाळे यांनी अरगडे यांना वेळोवेळी व्यवहाराबद्दल विचारणा केल्या असता अरगडे यांनी प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे डहाळे यांनी अनामत म्हणून दिलेल्या पाच लाख रुपयांची मागणी केली असता अरगडे याने पाच लाख रुपयांचा धनादेश डहाळे यांना दिला होता.

डहाळे यांनी हा धनादेश बँकेत भरल्यानंतर तो खात्यावर निधी अपुरा असल्याने परत आला. त्यामुळे डहाळे यांनी अरगडे यांना नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. मात्र रक्कम न मिळाल्याने डहाळे यांनी अरगडे यांच्या विरोधात न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस अॅक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. न्यायाधीश डी. एम. गिरी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

न्यायालयाने आरोपी प्रकाश प्रभू अरगडे याला दोषी ठरवत एक वर्षाचा साधा कारावास आणि 5,00,000/- (रु. पाच लाख रुपये) ची भरपाई देण्याचा हुकूम केला. या निर्णया विरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केल्याची माहिती मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,022
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.