Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा अपहार प्रकरणी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर; आता मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे!
गुन्हेगारी

दूधगंगा अपहार प्रकरणी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर; आता मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे!

दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2023Updated:06/10/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कॅशियर उत्तम लांडगे याला ११ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी तपासात फारसी प्रगती होत नसतानाच या घोटाळ्यातील एक आरोपी पोलिसात हजर झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिसांनी उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तब्बल ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा आपल्या कुटुंबीयांसह फरार आहे. तर पंधरा मुख्य आरोपींपैकी एकमेव व्यवस्थापक अटकेत असून आज न्यायालयासमोर हजर केलेल्या उत्तम शंकर लांडगे यांच्यासह सहा जणांवर या आरोपींना सहाय्य केल्याचा आरोप आहे.

सुरुवातीलाच याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एका आरोपीला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून कोठडीतील काही आरोपींना न्यायालयात जामीन मिळाला आहे.

उत्तम लांडगे हे दूधगंगा नागरी पतसंस्थेत कॅशियर म्हणून काम पाहत होते. लेखापरीक्षकांनी दाखल केलेल्या फिर्यादीत त्यांचादेखील आरोपींमध्ये समावेश असल्याने ते गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी त्यांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आणले होते. लांडगे यांच्यावतीने ॲड. श्रीराम गणपुले यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले.

पोलिसांच्या वतीने सरकारी वकील गवते यांनी आरोपीला ९ हजार रुपये दरमहा पगार होता. त्याने ७५ लाख रुपये कर्ज कशाच्या जोरावर घेतले ? तसेच पतसंस्थेच्या मॅनेजरच्या खात्यावर त्यातले ५६ लाख १९ हजार रुपये ट्रान्सफर केले आणि १८ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम स्वतः काढून घेतली. या सर्व रकमेची गुंतवणूक कुठे झाली, त्यात कोणाचा सहभाग आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे घेतली याबाबतचा शोध घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे परतफेड दाखवताना संस्थेच्या अल्पबचत मुदत ठेव खात्यातून ८७ लाख रुपये काढून ते विजय गुंजाळ (मॅनेजरचा भाऊ) यांच्या अकाउंट वर आरोपीने जमा केले व पुन्हा ते आरोपीने स्वतःच्या नावावर कर्ज नील दाखवण्यासाठी वर्ग केले. अशाप्रकारे कॅशियर लांडगे याचा या संपूर्ण अपहार प्रकरणात नेमका काय रोल होता हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपीचे वकील गणपुले यांनी याप्रकरणी आरोपीची बाजू मांडली. न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांनी आरोपीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेच्या अटकेचे काय?

दूधगंगा अपहार प्रकरणी तब्बल २१ जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेला राजकीय प्रतिष्ठित जिल्हा परिषदेचा माजी सदस्य व पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे कुटुंबीयांसह फरार आहे. या सर्वांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील तपास अधिकारी अद्यापही मुख्य आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. भाऊसाहेब कुटेसह काही आरोपी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असल्याने व राज्यातील बड्या राजकीय नेत्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधामुळे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचत नसल्याची चर्चा होताना दिसते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,111
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.