Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ७७ रुपये लिटरने डिझेल विक्री करणाऱ्या डिझेल पंपावर पोलिसांचा छापा; पोलीस उपाधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत २१ हजार लिटर डिझेल पकडले.. दोघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

७७ रुपये लिटरने डिझेल विक्री करणाऱ्या डिझेल पंपावर पोलिसांचा छापा; पोलीस उपाधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत २१ हजार लिटर डिझेल पकडले.. दोघांवर गुन्हा दाखल

नगरी आशीर्वादामुळे संगमनेर मध्ये अवैध धंदे तेजीत;
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 10, 2023Updated:October 10, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावच्या शिवारात एका बेकायदेशीर डिझेल विक्री केंद्रावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा सोमवारी टाकण्यात आला. या छाप्यात या डिझेल पंपाच्या माध्यमातून अवैधरित्या, असुरक्षित अवैध चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नासिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी शिवारात असलेल्या हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते.

नासिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याच्यापुढे काही अंतर गेल्यानंतर हॉटेल पांडुरंगाच्या विरुद्ध दिशेला ‘सुरत काठीयावाडी’ नावाच्या बंद ढाब्यामागे मोकळ्या जागेत पोलीस पथकाला पथकाला अवैधरित्या एका मोठ्या टँकरची टाकी जमिनीवर ठेवून या टाकीमधून पाईपलाईन करून लगतच्या एका पत्राच्या शेडमध्ये प्लास्टिक टाक्यांमध्ये डिझेल भरून ठेवलेले दिसून आले. इलेक्ट्रॉनिक मोटरच्या सहाय्याने हे डिझेल ओढून त्याची विक्री करण्यात येत होती. डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी एक मशीन जोडले होते. त्याला इलेक्ट्रिक सप्लाय देऊन पोलिसांनी तपासून पाहिले असता त्याच्यावर ७७ रुपये लिटर असे रीडिंग दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी तातडीने याची माहिती संगमनेरच्या तहसीलदारांना दिली. तहसीलदारांनी घटनास्थळी पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांना पाठविले. पुरवठा अधिकारी भालेराव यांच्या समक्ष पंचनामा करून पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांना १८ लाख २६ हजार रुपये किमतीचे २१००० लिटर डिझेल आढळून आले. तसेच पाच लिटर क्षमतेची एक, दोन-दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या, तीन हजार लिटर क्षमतेची एक लोखंडी टाकी आढळून आली.

कारवाई जप्त केलेले डिझेलचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बीट अंमलदार सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंधनाचा असुरक्षित रित्या बेकायदेशीर साठा करून चोरटी विक्री केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४२०, २८५, ३४ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ उल्लंघन ७ प्रमाणे व मुंबई वजन मापे अंमलबजावणी अधिनियम १९५८ चे कलम २५ प्रमाणे सोजित्रा भाविनकुमार आनंदभाई (वय २९, रा. सुरत, गुजरात, सध्या रा. चंदनापुरी, संगमनेर) व जागामालक नितीन सुनील गोसावी (रा. संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 995
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.