Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गस्तीवरील उपाधीक्षकांच्या पोलीस पथकाने भल्या पहाटे बेकायदा कत्तल खान्यावर टाकलेल्या छाप्यात मिळाला सुमारे सात लाखाचा मुद्देमाल…
गुन्हेगारी

गस्तीवरील उपाधीक्षकांच्या पोलीस पथकाने भल्या पहाटे बेकायदा कत्तल खान्यावर टाकलेल्या छाप्यात मिळाला सुमारे सात लाखाचा मुद्देमाल…

पोलिसांच्या शेकडो कारवाया नंतरही संगमनेरातील कत्तलखाने सुरूच!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2023Updated:11/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गोवंश कत्तलीसाठी कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याचे शेड केली नेस्तनाबूत!

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर –  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांनी लक्ष घातलेले बेकायदेशीर कत्तलखाने आता चोरी-चुपके सुरू आहेत. अशाच एका कत्तलखान्यावर बुधवारी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याची शेड प्रथमत:च या कारवाईमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली आहे.

पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कत्तलखाने बंद करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात केला असताना पोलिसांची नजर चुकवून हे कत्तलखाने चोरी चुपके सुरू असल्याचे दिसते. संधी मिळताच अवघ्या तास-दोन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होते. उत्तर नगर जिल्ह्याच्या रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुरुवारी पहाटे जमजम कॉलनी येथील कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

वाकचौरे यांनी ही माहिती तातडीने गस्तीवरील प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, आरटीपीसी पोलीस नाईक अनिल कडलक व शामराव सुखदेव असे यांना देत छापा मारण्यास सांगितले. या पथकाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी व विठ्ठल पवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनीत माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे MH 04 AW 3164 या ओमनी कारमध्ये 1100 किलो गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस आढळून आले.

पोलीस पथकाने छापा टाकल्याचे दिसतात ओमनी कार चालक, जवळच्या पत्र्याच्या शेडचा मालक, जागा मालक पळून गेले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाला सरकार लॉन्स जवळील एका निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये चार लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे कत्तल केलेले गोमांस आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ओमनी कारसह एकूण 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक शामराव हासे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवाज कुरेशी, जब्बार पटेल, वाहिद कुरेशी (तिघेही रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या तिघा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 269, 429 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1955 चे कलम 5(क), 9(अ) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,403
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.