Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था स्कॅम : आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर; संगमनेर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीसह चार संचालक आले रडारवर… गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याची धाडली नोटीस
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था स्कॅम : आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर; संगमनेर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीसह चार संचालक आले रडारवर… गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याची धाडली नोटीस

चेअरमन भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपी सापडेनात!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2023Updated:19/10/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आर्थिक गुन्हे शाखा चार संचालकांची आज करणार चौकशी

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

आदर्श सहकारासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकाराला कलंकित करणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही राजकीय प्रतिष्ठित आरोपी पोलिसांना सापडत नसतानाच आता आता आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या चार संचालकांना गुरुवारी (ता. १९ ऑक्टोंबर) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस धाडली आहे.

या चारही संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात संगमनेरमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संचालक राहिलेल्या सर्वांनाच राजकीय पार्श्वभूमी आहे. संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांच्यावर प्रामुख्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या संस्थेची सुई असून ते आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी कामी नोटीस बजावलेल्या संचालकांमध्ये नवनाथ अरगडे यांच्यासह भास्कर पानसरे, भास्कर शरमाळे व रामनाथ कुर्हे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.

सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दूधगंगा नागरी पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे असून अद्याप या तपासात फारशी प्रगती समोर आलेली नसतानाच मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, ठेवी परत मिळाव्यात आधी विविध मागण्यांसाठी ठेवीदार संघर्ष समितीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला असून असून आरोपी कुटेचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. काही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अद्यापही काही प्रमुख आरोपी समोर आलेले नाहीत. तर देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणात सुरुवातीपासूनच चेअरमन भाऊसाहेब कुटेसह संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती असलेल्या नवनाथ अरगडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनंतर अरगडे यांना क्लीनचिट मिळाल्याचे बोलले जात होते. आता मात्र तपासा दरम्यान अरगडे यांच्यासह काही संचालक पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहे.

या संचालकांच्या काळात मंजूर झालेली कर्ज प्रकरणे, इतर बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवी संदर्भातील निर्णय, संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहण्याकरिता देण्यात आलेले सह्यांचे अधिकार, कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज प्रकरणे यासंबंधीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वाची काही माहिती लागल्यास आरोपींच्या संख्येत देखील संचालकांच्या रुपाने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,303
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.