Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खुनाच्या घटनेला ६ महिने उलटले… पोलिसांनी संशयित आरोपींची ‘लाय डिटेक्टर चाचणी’ही केली; तरीही पोलिसांना आरोपी सापडेनात!
गुन्हेगारी

खुनाच्या घटनेला ६ महिने उलटले… पोलिसांनी संशयित आरोपींची ‘लाय डिटेक्टर चाचणी’ही केली; तरीही पोलिसांना आरोपी सापडेनात!

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरण....
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचे उदाहरण समोर आले आहे. पोलिसांच्या तपासाअभावी एका खून प्रकरणाचा उलगडा होण्यास विलंब लागत असल्याने मृत व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणीसुद्धा केली आहे मात्र तरीही पोलिसांना अद्यापही खुनी सापडला नसून यामुळे पोलिसांचे अपयश उघड झाले आहे.

फक्त गुन्हे दाखल करून पुढील तपासात काहीही निष्पन्न होत नसल्याचे प्रकार अथवा निष्पन्न न करण्याचा निष्काळजीपणा संगमनेर पोलिसांकडून होत आहे. यात संगमनेर उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्यात असे प्रकार प्रकार आढळून येत आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वयस्कर व्यक्तीचा त्याच्याच राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. पोस्टमार्टम नंतर सदर व्यक्तीचा धारदार शस्त्राने छातीवर, पाठीवर आणि हातावर वार करून, गंभीर दुखापत करून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी घारगाव पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या सहा महिन्यापासून या खुनाचा तपास सुरू असून अज्ञात आरोपी अद्याप सापडलेला नाही. या खुनामध्ये किती आरोपी सहभागी आहेत ? त्यांची संख्या किती आहे ? हे सुद्धा पोलिसांकडून अद्याप पर्यंत निष्पन्न झालेले नाही. सुमारे आठ ते नऊ जणांची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली आहे.

दरम्यान बऱ्याच संशयीतांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. यामध्ये काही संशयीतांना परस्पर ताब्यात घेऊन त्यांची थेट ‘लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी’ देखील पोलिसांनी करून टाकली असून त्यातून देखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विनाकारण काही संशयीतांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशी आणि चाचणी केल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचे समजले.

पोलिसांच्या या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे एकंदरीत या खुनाच्या तपासात पोलिसांकडून ‘साप साप म्हणत भुई धोपटायचे’ काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. की तसे दाखवले जात आहे ? हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालू आहे असा प्रश्न उपस्थित झाला असून ‘लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी’ बाबतही यातील तज्ज्ञ मंडळींकडून शंका व्यक्त होत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 809
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.