Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पोलिसाला सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी लाच मागणारा सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पोलिसाला सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी लाच मागणारा सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पोलिसाला सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

सुनील बाबुराव सावंत (वय 51 वर्ष, सध्या रा. शालिनी अपार्टमेंट, रूम नंबर 5, लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागे, माहीम रोड, पालघर) असे लाच लुचपत विभागाने पकडलेल्या लोकसेवकाचे नाव असून ते अतिरिक्त सत्र न्यायालय पालघर येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता- वर्ग 1 या पदावर कार्यरत आहे.

सरकारी वकील सावंत यांच्या विरोधात पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेमध्ये पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराविरोधात सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3/15 भारतीय दंड विधान कलम 376 प्रमाणे दाखल होता. या खटल्याची सुनावणी पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. तक्रारदार आरोपीला न्यायालयाने 2023 मध्ये या खटल्यातून निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाने तक्रारदाराला निर्दोष मुक्त केले असल्याने तक्रारदाराने पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेकडे त्यांच्या पदोन्नती बाबत अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्याकडे पत्र व्यवहार करून तक्रारदार निर्दोष सुटलेल्या खटल्याबाबत सद्यस्थिती अहवाल मागविण्यात आला होता.

अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याकरिता आरोपी लोकसेवक अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनील बाबुराव सावंत यांनी बुधवारी (ता. 25 ऑक्टोंबर) तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीने ही रक्कम सात हजार रुपयांवर निश्चित झाली होती.

त्यानंतर पालघर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (ता. 26 ऑक्टोंबर) पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, संजय सुतार, नवनाथ भगत, नितीन पागधरे, योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी आणि जितेंद्र गवळी यांनी लावलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना सरकारी वकील सुनील सावंत याला रंगेहाथ पकडण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,008
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.