Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंद्यावरील कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केले; गुटखा तस्कराकडून संपादकाला दमबाजी, शिवीगाळ… पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

अवैध धंद्यावरील कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केले; गुटखा तस्कराकडून संपादकाला दमबाजी, शिवीगाळ… पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हप्ते खोरी वाढणार की अवैध धंद्यांवर लगाम येणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

ज्यांनी अवैध धंद्यांवर लगाम आणायचा त्यांनीच हप्तेखोरी करत अवैध व्यावसायिकांशी हात मिळवणी केल्याने संगमनेरमधील अवैध व्यावसायिक मुजोर बनले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाला लक्ष घालावे लागले. “आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही”, या तोऱ्यात असलेल्या सटरफटर व्यावसायिकांवर त्यांनी केलेल्या किरकोळ कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याने अवैध व्यावसायिकाकडून सायं दैनिकाच्या संपादकाला दमदाटी, शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे.

संगमनेरमधील दैनिक प्रवरातीरचे संपादक धीरजसिंह ठाकुर यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय भागवत उर्फ बुट्ट्या आणि देवा दाजी पूर्ण नाव माहित नाही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने संगमनेरमध्ये तीन गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईचे वृत्त ठाकूर यांनी आपल्या दैनिकात प्रसिद्ध केले होते. अवैध व्यवसायाची बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्या तस्करांकडून दमबाजी करण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार आहे. स्थानिक यंत्रणेचे मिळत असलेले पाठबळ यामुळे अशा अवैध व्यावसायिकांचे मनोधैर्य उंचावले असल्याचे दिसते.

भागवत याने सुरुवातीला ठाकूर यांना मोबाईल वरून व्हाट्सअपद्वारे मेसेज करून धमकी दिली. त्यानंतर काही वेळातच त्याने धमकीचा मेसेज व्हाट्सअपवरून डिलीट केला. मात्र बातमीमुळे दुखावलेल्या भागवत याने ठाकूर यांना थेट फोन करत शिवीगाळ, दमबाजी करत धमकी देण्याचा प्रकार घडला. आरोपीने आज धमकी दिली उद्या तो हल्ला करण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

नेमका काय प्रकार होता…

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी परिक्षेत्रातील अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी नेमलेल्या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेटीत ज्युनिअर कॉलेज समोरील कादंबरी पान स्टॉल, श्रीराम किराणा स्टोअर्सवर छापा टाकला होता. छाप्यात प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेण्यात आला होता. या कारवाईत अविनाश नामदेव जगदाळे (वय 36 रा. श्रीरामनगर, बीएड कॉलेज समोर, संगमनेर), बाळासाहेब शिवाजी नेहे यांच्यासह विजय भागवत (रा. इंदिरानगर, संगमनेर) या तिघांवर गुन्हा दाखल केला होता. या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणातून हा प्रकार घडला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 668
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.