Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… संगमनेरच्या उपकारागृहातून चार आरोपींचे सिनेस्टाईल पलायन! पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची नाचक्की करणारी दुसरी घटना समोर
गुन्हेगारी

धक्कादायक… संगमनेरच्या उपकारागृहातून चार आरोपींचे सिनेस्टाईल पलायन! पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची नाचक्की करणारी दुसरी घटना समोर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2023Updated:08/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : संगमनेरमधून पोलीस दलाचे नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार आरोपींनी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे. या कोठडीतून आरोपी पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली अजून पळून गेलेल्या चारही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली.

राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा असे कोठडीचे गज कापून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वजण संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते. राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून अनिल ढोले याच्यावर पोटच्या मुलीवर बलात्कार, पोक्सो, मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा तर रमेश दधेल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी कोठडीतून पळून जाण्याचा प्रकार बुधवारी पहाटे समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान यासंदर्भात अद्याप पर्यंत पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी उप कारागृहात बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डवर तातडीने कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

तहसील आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच उपकारागृह असून या कारागृहामध्ये तीन कुठे आहेत या कोठड्यांमध्ये नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त आरोपी अटकेत ठेवलेले असतात. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि तुरुंग प्रशासनाच्या आशीर्वादाने कारागृहातील आरोपींना बाहेरचे जेवण, गुटखा, तंबाखू, मोबाईल आदींसह नातेवाईक मित्रमंडळींच्या भेटीगाठी सहजपणे उपलब्ध असतात. यामुळे कोठडीतील आरोपींची मुजोरी वाढून त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार देखील यापूर्वी घडले आहे. एवढेच नव्हे तर कोठडीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत कायद्यांचे वाढदिवस देखील साजरा झाल्याच्या घटना समोर आली आहे.

तीन नंबरच्या कोठडीचे गज कापून या आरोपींनी पलायन केले. आरोपींनी कोठडीचे गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेडचा वापर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय हे काम एका दिवसाचे नसून गेल्या काही दिवसापासून सातत्याने केले जात होते. याची माहिती कोठडीतील अन्य आरोपींना असून देखील त्यांनी याची वाच्यता केली नाही. तसेच सातत्याने बंदोबस्तावर असलेल्या तत्कालीन गार्डने देखील बारकाईने तपासणी केली नसल्याने आरोपींनी सहजपणे पलायन केल्याचे दिसून येते. पलायन केलेल्या चारही आरोपींच्या दिमतीला पळून जाण्यासाठी शहर पोलीस ठाण्याबाहेर चार चाकी देखील तैनात असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे तुरुंगाचे गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेड आले कुठून याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या आरोपींवर पोलीस ठाण्यातील कोणते अधिकारी मेहरबान होते का हे देखील शोधणे गरजेचे आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 12,251
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.