Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्याचा तर्क अखेर खोटा ठरला; मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणातून मित्रानेच केला खून!
गुन्हेगारी

बिबट्याच्या हल्ल्याचा तर्क अखेर खोटा ठरला; मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणातून मित्रानेच केला खून!

संगमनेर तालुक्यातील खून प्रकरणाचा झाला उलगडा...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या कुरकुटवाडी येथे २७ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री तरुणाच्या झालेल्या मृत्यूची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा तर्क अखेर खोटा ठरला. पोलीस तपासात मित्रानेच त्याच्या मैत्रिणीला पाठविलेल्या समाज माध्यमातील फ्रेंड रिक्वेस्टच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.

सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून गणेश बबन कुरकुटे (वय २१ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने या खुनाची कबुली दिली असल्याचे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे.

२७ ऑक्टोंबरला मध्यरात्री साडेबारा वाजले च्या सुमारास कुरकुटवाडी गावामध्ये घराच्या ओट्यावर झोपलेल्या सचिन भानुदास कुरकुटे याच्या मानेवर खोलवर झालेल्या जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.

त्यामुळे गोकुळ जिजाबा कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या संबंधीची कागदपत्रे घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. दरम्यान रात्रीची वेळ असल्याने मृत सचिन याच्यावर बिबट्याने हल्ला केला व त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा तर्क काढला गेला होता तसेच या अनुषंगाने सर्वत्र चर्चा देखील सुरू होती.

आळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये सचिन कुरकुटे यांच्या मानेवरील जखम हत्याराने झाली असल्याचा निष्कर्ष काढला असल्याने तपास अधिकाऱ्यांनी सचिन कुरकुटे याचा खून झाला असावा या अंदाजाने पुढील तपास सुरू केला होता.

मृत सचिन कुरकुटे याचे आर्थिक व्यवहार तसेच घरगुती व बाहेरील लोकांसोबत असलेले वाद, प्रेम संबंध यासह अन्य शक्यता लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तपासा दरम्यान पोलिसांनी जवळपास डझनभर लोकांचे जबाब नोंदविले तसेच मृत सचिन कुरकुटे यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास केल्यानंतर त्याने एका मैत्रिणीस समाज माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असल्याचे लक्षात आले.

मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, या कारणामुळे सचिन कुरकुटे व गणेश कुरकुटे यांच्यात वाददेखील झाले होते ही बाब समोर आली. त्यानंतर केलेल्या तपासात गणेश कुरकुटे यांनी या रागातून सचिन कुरकुटे याची झोपेत असताना गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी गणेश कुरकुटे आला पोलिसांनी अटक केली असून त्याने खून केल्याची कबुली दिली.

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहाय्यक फौजदार एस. डी. टकले, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. चव्हाण, प्रमोद गाडेकर, एन. एम. बिरे, एस. एस. धनाड, सायबर सेलचे ए. ए. बहिरट यांनी या गुन्ह्याची उकल केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,429
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.