Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊबीजेच्या दिवशी पोलीस शिपायाची स्वतःवर रायफलने गोळी झाडून घेत आत्महत्या
गुन्हेगारी

भाऊबीजेच्या दिवशी पोलीस शिपायाची स्वतःवर रायफलने गोळी झाडून घेत आत्महत्या

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

दीपावलीची धामधूम सुरू असतानाच भाऊबीजेच्या दिवशी पोलीस शिपायाने स्वतःवर रायफलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राहुल शिरसट (वय 35 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून आत्महत्येचे निश्चित कारण लगेच समजू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील केशवनगर पोलीस वसाहतीत ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले राहुल शिरसाट हे पोलीस आयुक्त बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सुरक्षेसाठी शिरसट यांच्याकडे एसआरएल रायफल होती. ड्युटी संपल्यावर ते आपल्याकडील रायफल जमा करत असत. बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी आपल्याकडील रायफल जमा न करता ती घरी नेली होती.

केशवनगर पोलीस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला असल्याचे घटनास्थळी दिसून आले. आवाजाने आजूबाजूला राहत असलेल्या पोलिसांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले. दरम्यान, शिरसट यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल दाखल झाले.

मृत शिरसट हे २०११ साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. २०१७ साली त्यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करून घेतली होती. त्यांचे अख्खे कुटुंबीय पोलीस दलात आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार असून पत्नी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात तर भाऊ शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. बहीण पोलिस अधिकारी आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,188
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.