महाराष्ट्र संवाद न्यूज
देशभरात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतातच संगमनेरात मात्र हे कायदेशीर कत्तलखान्यांमधून जनावरांची अमानुष कत्तल सुरूच असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी शहरातील अलकानगर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करत ऐंशी हजार रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले.
बुधवारी रात्री पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे हे दोघेजण पेट्रोलिंग करत असताना साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांना अलका नगर मध्ये सुरू असलेल्या रेहान गुलाम नबी कुरेशी व त्याच्यासोबत आणखी दोघे अवैधपणे गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करत असल्याची माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या दोघा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात खात्री केले असता अलका नगर मधील एका गल्लीत असलेल्या घरात एक व्यक्ती गोवंश जनावराचे कत्तर करताना आढळून आला पोलिसांची चाहूल लागल्याने तो त्यातून पळून गेला पोलीस कर्मचाऱ्यांनी घराच्या पडवीत बघितले असल्यास तेथे कत्तल केलेले गोमांस दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती तातडीने पोलीस उपअधीक्षकांना दिल्यानंतर उपाधीक्षकांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस नाईक गवळी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश थोरात, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाट, पोलीस नाईक अनिल गवळी यांना घटनास्थळी पाठविले.
घटनास्थळावरून पोलिसांनी 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो वजनाचे गोमाऊंस ताब्यात घेतले. तसेच राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून आरोपी रेहान गुलाब नबी कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






