Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुय्यम कारागृहातील गज कापून पलायन करणाऱ्या चौघा आरोपींना मदत करणाऱ्या आणखी एकाला मालेगावमधून अटक; मदत करणारे आत्तापर्यंत सहा जण निष्पन्न
गुन्हेगारी

दुय्यम कारागृहातील गज कापून पलायन करणाऱ्या चौघा आरोपींना मदत करणाऱ्या आणखी एकाला मालेगावमधून अटक; मदत करणारे आत्तापर्यंत सहा जण निष्पन्न

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 17, 2023Updated:November 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमधील दुय्यम कारागृहातील गज कापून आश्चर्यकारकरीत्या पलायन करणाऱ्या चौघाही आरोपींना पुन्हा पकडल्यानंतर त्यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पळून जाणाऱ्या चारही आपल्या घरी जेवणाचा पाहुणचार देणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी मालेगावमधून अटक केली आहे. यामुळे चार मुख्य आरोपींसह आता अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रिजवान मोहम्मद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला असे या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा या चौघा आरोपींनी कारागृहाचे गज कापून पलायन केल्याची घटना आठ नोव्हेंबरला घडली. यामुळे तुरुंग प्रशासनासह पोलिसांची झोप उडाली होती. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने या चारही आरोपींना जळगावमध्ये दुसऱ्या दिवशी पकडले. या चार आरोपींसोबत त्यांना मदत केल्याच्या कारणावरून आणखी दोघांना पकडण्यात आले होते.

त्यापाठोपाठ आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून संगमनेर पोलिसांनी कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण (दोघे रा. संगमनेर) व प्रथमेश राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) या तिघा जणांना अटक केली होती. या तिघांनी मुख्य चार आरोपींना दुय्यम कारागृहातून पळून जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले होते. याशिवाय गाडीच्या नंबर प्लेट बदलविण्यासाठी मदत केली. मुख्य आरोपींना तारखांवेळी न्यायालयात हजर केले असता चोरून लपून त्यांच्याशी चर्चा करणे, पलायनासंबंधीचा पुढील प्लॅन ठरवणे, आरोपींना पळून जाण्यासाठी पैशाची व्यवस्था करून देणे आदी प्रकारची मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कारागृहात या सर्व आरोपींची एकमेकांशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली. आता या प्रकरणात पोलिसांनी नव्याने रिजवान बॅटरीवाला याला मालेगावमधून अटक केली असून कारागृहातून पालन केल्यानंतर या चौघाही आरोपींनी मालेगावमध्ये बॅटरीवाला याच्या घरी दोन तास थांबून पाहुणचार घेतला असल्याचे समोर आल्यानंतर बॅटरीवाला याला देखील पळून जाणाऱ्या चौघा आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी राहुल काळे नासिक सेंट्रल जेलमध्ये असताना काळे सोबत बॅटरीवाला याची ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी देखील मदत केल्याचे पुढे आले आहे. संगमनेर पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,256
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.