Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अधिकार नसताना निष्काळजीपणे गर्भपात शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अकोले तालुक्यातील डॉक्टरवर गुन्हा दाखल; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
गुन्हेगारी

अधिकार नसताना निष्काळजीपणे गर्भपात शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अकोले तालुक्यातील डॉक्टरवर गुन्हा दाखल; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2023Updated:24/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर: अधिकार नसताना देखील निष्काळजीपणा करत अपूर्णपणे गर्भपात करून गर्भ पिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक ठेवून अयोग्य पद्धतीने उपचार करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा कारणावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राजुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून डॉ. गोडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 304 अ तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 5 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातील शेणीत येथील सीताबाई संदीप तळपे या 24 वर्षीय विवाहितेच्या अंगावरून जात असल्याचा कारणावरून डॉक्टरांनी दिलेली गोळी घेऊन 11 मार्च 2023 रोजी झोपी गेली होती. तिला झोपेतून उठविण्यासाठी तिचा पती गेला असता तिची दातखीळ बसली असल्याचे दिसल्याने तिला औषधोपचारासाठी राजुरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी राजुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

तसेच राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात फॉरेन्सिक एक्सपर्ट उपलब्ध नसल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन लोणी येथील प्रवरा रुग्णालयात करण्यात आले. वैद्यकीय अहवालात या महिलेचा मृत्यू गर्भपातामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच मृत महिलेचा व्हिसेरा तपासणीसाठी नाशिकच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला.

उपनिरीक्षक शेख यांनी केलेल्या अकस्मात मृत्यूच्या चौकशी दरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते. यात मृत झालेली महिला चार महिन्यांची गरोदर असताना डॉ. भोकनळ यांच्या सल्ल्यानुसार तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीच्या अहवालानंतर डॉक्टरांनी पोटातील गर्भ खराब असल्याचे सांगून तो काढून टाकण्याचे सुचविले होते.

त्यामुळे कुटुंबीयांनी या महिलेला राजुर येथील डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्या रुग्णालयात दाखल करून तिचा गर्भपात करून त्याच दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून तिच्या पोटात दुखत होते. पोटात जास्त दुखू लागल्याने तिला पुन्हा डॉ. भोकनळ यांच्याकडे नेण्यात आले. भोकनळ यांच्या सल्ल्यावरून या महिलेची पुन्हा सोनोग्राफी केली असता सोनोग्राफीच्या अहवालात संबंधित महिलेच्या पोटात गर्भाचा तुकडा राहिला असल्याने अपुरा गर्भपात झाला असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे रुग्ण महिलेची पिशवी साफ करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या महिलेला पुन्हा त्रास झाल्याने तिला डॉ. भोकनळ यांनी गोळ्या देऊन घरी पाठविले. 11 मार्च 23 रोजी रात्री जेवणाआधी एक गोळी घेऊन महिला झोपी गेली असता सकाळी झोपेतच तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी डॉ. गोडगे व डॉ. भोकनळ यांनी केलेल्या गर्भपाताच्या उपचारा संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांचा अभिप्राय घेण्यात आला. शल्यचिकित्सकांनी चौकशीसाठी एक समिती नेमली होती.

समितीने केलेल्या औषधोपचाराच्या कागदपत्रांच्या तपासणीत डॉ. बाबासाहेब गोडगे यांना गर्भपात करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या महिलेवर केलेले उपचार योग्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अभिप्राय दिला होता. या आधारे डॉ. गोडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,349
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.