Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेअर मार्केटचं आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची पावणे चार कोटींची फसवणूक
गुन्हेगारी

शेअर मार्केटचं आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची पावणे चार कोटींची फसवणूक

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकास तब्बल ३ कोटी ७० लाखांना गंडा घालण्यात आला आहे. शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायबर भामट्यांनी नाशिक येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते.
व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले आहेत. त्याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला आहे. हे खात्रीशीर आहे. बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज या व्यावसायिकाला करण्यात आले. यामुळे व्यावसायिकाने सायबर भामट्यांवर विश्वास टाकला आणि त्या स्कीममध्ये पैसे गुंतवले. त्यानंतर साडेसात कोटी रुपये काढताना व्यावसायिकाला अडचण आली. त्यामुळे व्यावसायिकाच्या मुलाने या अ‍ॅपची माहिती घेतली असता मुलाला आपल्या वडिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने तात्काळ सायबर पोलिसात धाव घेतली आणि आपली आपबिती पोलिसांना सांगितली. त्यानुसार ब्लॅकरॉक कॅपिटल सिक्युरिटीज मार्केट पुलअप टीम नावाचा व्हाट्सअॅप ग्रुप व त्यावरील क्रमांक 6300626686, 9482347361, 9417418197, अँजल वन कस्टमर केअर या नावाच्या ग्रुपमधील व्हाटस्अ‍ॅप क्रमांक 9226156675, 9472263175, 918762699376, 918235835947 आणि मेलिस्सा तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे वर्ग झालेले बँक खातेधारक या सायबर भामट्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,232
फसवणूक शेअर मार्केट सायबर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.