Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबी (LCB) पीआयच्या घरात सापडले हे कोट्यावधीचे घबाड; ६० लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने सव्वा लाखाची रोकड पावणेदोन कोटीचे मूल्यांकन असलेली मालमत्तेची कागदपत्रे… लाचखोरीचा कळस
गुन्हेगारी

एलसीबी (LCB) पीआयच्या घरात सापडले हे कोट्यावधीचे घबाड; ६० लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने सव्वा लाखाची रोकड पावणेदोन कोटीचे मूल्यांकन असलेली मालमत्तेची कागदपत्रे… लाचखोरीचा कळस

पगारात लाचखोर अधिकाऱ्यांचे पोट भरेना!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. १० एप्रिल 

एका सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यावरील हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी (१ एप्रिल) एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार अशोक पाटील आणि नितीन मोहने यांना लाच लुचपत विभागाने अटक केली होती. आता या पीआयच्या घरात लाच लुचपत विभागाला मोठे घबाड सापडले आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील राजकीय व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व्यक्ती विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी या राजकीय कार्यकर्त्याची भेट घेत त्याच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवून जिल्ह्यातून हद्दपार करणार आहोत, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले.

हद्दपारीची कारवाई होऊ द्यायची नसेल तर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले. तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट तक्रारदारांनी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे तक्रारदार यांनी १ एप्रिल रोजी धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जात पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांची भेट घेतली असता पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदरची रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील यांना देण्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

दोंडाईचा येथे दोंडाईचा-धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ठरल्याप्रमाणे पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांनी तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली होती. अटक केलेल्या पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्याच्या दोघा सहकार्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

दरम्यान याप्रकरणी लाच लुचपत शाखेच्या अधिकाऱ्यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक शिंदे याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना घरात मोठे घबाड आढळून आले.

लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरात नेमकं काय सापडलं…
९०० ग्रॅम वजनाचे ५९ लाख रुपयांचे दागिने. 
१० लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने.
१ लाख २६ हजार रुपयांची रोकड. 
स्वतःसह पत्नी आणि इतर नातलगांच्या नावावर असलेली १ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,665
एलसीबी घबाड पोलीस निरीक्षक लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.