Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस रेकॉर्डवरील या दोघा गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
गुन्हेगारी

पोलीस रेकॉर्डवरील या दोघा गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

प्रांत अधिकारी हिंगे, डीवायएसपी वाघचौरे यांची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. १२ एप्रिल 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवर असलेल्या संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी काढले आहेत.

कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली.

कासिम कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, त्यांची कत्तल करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.

इस्माईल पठाण याचा विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, वाहन चोरी करणे अशा स्वरूपाचे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे शहर पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांना कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हद्दपार करण्यासाठीचे प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याकडे पाठवले होते. त्यानंतर पुढील निर्णयासाठी हे प्रस्ताव प्रांताधिकारी हिंगे यांच्याकडे पाठविण्यात आले. हिंगे यांनी या प्रस्तावावर निर्णय देताना कासिम कुरेशी याला एक वर्षांसाठी तर इस्माईल पठाण याला सहा महिन्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून कारवाई सत्र सुरू असून आणखी कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,444
पोलीस शैलेंद्र हिंगे सोमनाथ वाघचौरे हद्दपार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.