Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश वटला नाही, न्यायालयाने संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला चार लाखाच्या दंडासह दिली सक्तमजुरीची शिक्षा!
न्यायालय

पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश वटला नाही, न्यायालयाने संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला चार लाखाच्या दंडासह दिली सक्तमजुरीची शिक्षा!

फौजदारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 18, 2024Updated:May 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १८ मे

पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने शनिवारी संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला तब्बल चार लाख रुपयांचा दंड आणि एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रुपेश सुभाष वर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणाऱ्यांमध्ये चपराक बसली असल्याचे मानले जाते.

संगमनेरच्या बाजारपेठेतील सुवर्ण व्यावसायिक रुपेश सुभाष वर्मा यांनी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून तीस लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज २०१८ मध्ये घेतले होते. आज अखेर या कर्जाची थकबाकी ६७ लाखावर गेली आहे. संस्थेने वारंवार त्यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केल्यानंतर वर्मा यांनी संस्थेला धनादेश वटण्याची हमी देत २ लाख ४८ हजार ०८० रुपयांचा धनादेश पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकीपोटी दिला होता.

सदरचा धनादेश न वटता परत आल्याने संस्थेने याची कल्पना वर्मा यांना देत पैसे भरण्यास सांगितले. मात्र सुवर्ण व्यावसायिक वर्मा यांनी पैसे न भरल्याने संस्थेने संगमनेरच्या न्यायालयात न वटणारा धनादेश देत पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी २०१९ मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. सुवर्ण व्यावसायिका विरोधात धनादेश बाउन्स प्रकरणी दाखल झालेल्या या खटल्याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते.

दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्रीमती एम. जे. गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. फिर्यादी संस्थेचे वकील ॲड. राजेश भुतडा यांनी न्यायालयासमोर संस्थेची बाजू मांडत त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी न्यायालयासमोर आणल्या. तसेच संस्थेचे व्यवस्थापक गजानन ठाकरे यांची देखील या खटल्यात साक्ष नोंदविण्यात आली.

फिर्यादी संस्था आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांनी आरोपी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरविले. खटल्यात व्यवस्थापक ठाकरे यांचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला त्यांना संस्थेचे वसुली अधिकारी रामदास घुले यांनी, तर संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. राजेश भुतडा यांना ॲड. स्वप्निल उपरे यांनी सहाय्य केले.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,934
निवाडा न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.