Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून वाळू तस्करांनी पोलीस पाटलाच्या मदतीने ट्रॅक्टर पळविला! पोलीस पाटलाचे निलंबन
गुन्हेगारी

सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून वाळू तस्करांनी पोलीस पाटलाच्या मदतीने ट्रॅक्टर पळविला! पोलीस पाटलाचे निलंबन

तीन दिवसांपूर्वीच पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून वाळू तस्करांकडून जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. २२ मे

वाळू तस्करांकडून श्रीरामपूरमध्ये पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे समोर आले आहे.

श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांना महांकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधिक्षक बेनीवाल यांनी सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी केशव वारे, चाँद पठाण यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने घटनास्थळी जात खात्री केली असता त्यांना तेथे निळ्या रंगाचा ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करताना दिसून आला. पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतला. मात्र, चालकाने पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर वैजापूर तालुक्यातील नागमठाणच्या दिशेने पळविला. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला, तेव्हा चालक नागमठाण शिवारातील एका शेतात ट्रॅक्टर सोडून पसार झाला.

त्या ठिकाणी पथकडून पुन्हा जप्तीची कारवाई सुरू असताना अण्णासाहेब गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ, पोलिस पाटील गणेश नरहरे व अन्य चार ते पाच इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर बळजबरीने धक्काबुक्की करून तसेच ट्रॅक्टरमधील वाळू नागमठाण येथील शेतामध्ये खाली करून ट्रॅक्टर पळवून लावला.

या संदर्भात पोलिसांनी सोमवारी रात्री अण्णासाहेब गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ व पोलीस पाटील गणेश नरहरे यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरोधात शासकीय वाळू चोरी करून पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

पोलीस पाटलाचे निलंबन … नागमठाण येथील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड यांनी याची गंभीर दखल घेत तलाठ्यास अहवाल सादर करण्यास सांगितले. तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांनी पोलीस पाटील यांच्याकडे मदत मागितली मात्र पोलीस पाटीलांनी वाळू माफियांचा मदत केली असा अहवाल सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड यांनी चांदेगावचे (ता. वैजापूर) पोलिस पाटील गणेश नरहरे यांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ पारित केले. नरहरे यांच्याकडे नागमठाणचाही प्रभारी पदभार होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,075
वाळू तस्करी श्रीरामपूर हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा…

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.