Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणी संगमनेरातील उद्योजकाने न्यायालयाच्या आदेशावरून दिला पहिला डिमांड ड्राफ्ट
गुन्हेगारी

नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणी संगमनेरातील उद्योजकाने न्यायालयाच्या आदेशावरून दिला पहिला डिमांड ड्राफ्ट

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 9, 2024Updated:June 10, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दिनांक ९ जून २०२४

बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बडा थकबाकीदार कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित यांनी जामिनावर मुक्तता होताच १५ दिवसांच्या आत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात जमा केल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात संगमनेरमधील कर्जदार आरोपी म्हणून उद्योजक अमित पंडित यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक देखील केली. तब्बल दोन महिन्यानंतर पंडित यांना न्यायालयाने काही अटींवर एक लाख रुपयांचे वैयक्तिक जात नसेल त्यावर तीन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.

जामिनावर मुक्तता होताच पंडित यांनी पंधरा दिवसाच्या आत दोन कोटी रुपये व त्यानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरण्याची प्रमुख अट उच्च न्यायालयाने घातली होती. त्यानुसार पंधरा दिवसांची मुदत संपण्यापूर्वी पंडित यांनी न्यायालयात कबूल केल्याप्रमाणे दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात जमा केला आहे. असे असले तरी पंडित यांस अद्यापही येत्या तीन महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहे.

कर्जदार आरोपी पंडित याने स्वतःचा पत्नी व मुलाच्या तसेच भागीदाराच्या नावावर मोठ्या रकमेचे कर्ज घेतले आहे. इतर ठिकाणचे कर्ज फेडण्यासाठी व नवीन मशिनरीच्या खरेदीसाठी त्याने हा प्रकार केलेला होता. आरोपी कर्ज फेडण्यास पात्र आहे की नाही याची देखील तत्कालीन कर्ज मंजूर करणाऱ्या व्यक्तींनी शहानिशा केली नाही आणि अशाच पद्धतीचे अनेक घोटाळे नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात घडलेले आहेत .

नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती करत आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या कर्जवाटप केल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. बँकेवर नेमलेल्या अवसायकांकडून या कर्ज वसुलीसाठी पावले उचलले गेल्यास ठेविदारांना दिलासा मिळू शकतो. मात्र मोठ्या प्रमाणात कर्ज उचलायचे आणि किरकोळ रकमेवर सेटलमेंट करायची यामुळे ठेवीदारांच्या नुकसानीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 11,360
अमित पंडित नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.