Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांमुळे मूळ मालकांना मिळाले हरवलेले मोबाईल
गुन्हेगारी

पोलिसांमुळे मूळ मालकांना मिळाले हरवलेले मोबाईल

पोलीस उपाधीक्षकांचे महत्त्वाचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/06/2024Updated:23/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २३ जून 

संगमनेर उपविभागात नागरिकांच्या महागड्या मोबाईल चोरीचे प्रमाण मोठे असून अशा चोरी गेलेल्या मोबाईल पैकी १९ मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. त्यातील १२ मोबाईल मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

मोबाईल चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड, राम वेताळ यांनी सायबर सेलच्या मदतीने चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला.

पथकाला संगमनेर शहर व परिसरातून गहाळ झालेले जिओ कंपनीचे नऊ, ओप्पो कंपनीचे तीन, रिअल मी कंपनीचे तीन, वन प्लस कंपनीचे दोन व सॅमसंग कंपनीचे दोन असे १९ मोबाईल आढळून आले. या मोबाईलच्या मूळ मालकांचा देखील शोध घेण्यात आला. यातील १२ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. तर उर्वरित सात मोबाईलच्या मालकांशी संपर्क करण्यात आला असून त्यांना मोबाईल परत केले जाणार आहे.

दरम्यान चोरी गेलेले मोबाईल परत मिळणार नाहीत या आशेने मोबाईलचा शोध सोडून दिलेल्या मोबाईल मालकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पोलिसांबद्दल समाधानाचे भाव निर्माण झाले होते.

आवाहन … संगमनेर उपविभागांतील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले, राजुर पोलीस स्टेशन हंद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मोबाईल हरवल्यास पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंगबाबत नोंद करावी. जेणेकरुन सायबर सेलच्या मदतीने हरविलेल्या मोबाईलचा शोध घेता येईल. – सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक, संगमनेर

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 760
पोलीस मोबाईल सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.