Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेअर मार्केटमध्ये संगमनेरच्या व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक, पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये संगमनेरच्या व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक, पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके यांनी केली फसवणूक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
भगवान श्री जिव्हेश्वर जयंतीच्या सर्व साळी बांधवांना शुभेच्छा! – अनंत पांगारकर, संपादक महाराष्ट्र संवाद न्यूज.

शनिवार, १७ ऑगस्ट

शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो. त्यातून मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले असून या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (राहणार २७६, भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघा पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, संकेत कोकणे (कॉटन किंग, मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून सहा टक्के दराने पैसे मिळतील व त्यातून फायदा होईल असे सांगितले. त्यानुसार कोकणे यांनी ग्लोब कम्युनिटीज कन्सल्टन्सी, ठाणे या नावावर दिनांक १६ मे २०१९ रोजी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारा भरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा १७ मे २०१९ रोजी ५ लाख रुपये आरटीजीएस द्वारा भरले आणि २० मे २०१९ रोजी २ लाख रुपये रोख रक्कम शशांक वडके यांना दिले. असे एकूण ३० लाख रुपये कोकणे यांनी दिले.

शशांक वडके यांनी कोकणे यांना मी तुमचे अकाउंट काढतो आणि स्वतः चालवतो व तुम्हाला सहा टक्के दराने पैसे देतो असे सांगितले होते. मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे नोकरी करत आहे असेही कोकणे यांना सांगून ग्लोब कॅपिटल मार्केटिंग लिमिटेड या कंपनीची त्याची पत्नी प्रियंका हिच्याकडे एजन्सी असल्याचे त्याने कोकणे यांना भासविले होते. त्यानंतर साधारण पाच ते सहा महिने प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये एवढी रक्कम कोकणे यांना तो देत होता.

मात्र एवढी मोठी रक्कम देऊन एवढे कमी पैसे कसे येतात याचा संशय कोकणे यांना आला व त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी कोकणे यांनी मला पैसे गुंतवायचे नाहीत माझे संपूर्ण पैसे परत द्यावेत, अशी मागणी सुरू केली. त्यावेळी वडके याने आठ ते दहा दिवसात तुमचे पैसे देतो असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कोकणे यांनी फोनवर संपर्क साधून वडके यांना पैसे परत देण्याचा तगादा लावला. मात्र वडके याने मोबाईल फोन बंद करून तो नंतर संपर्कात येण्याचे टाळू लागला.

त्यामुळे कोकणे यांना अधिकच संशय आला. अधिक माहिती घेतली असता कोकणे यांच्या नावावर कोणतेही खाते नसल्याचे आणि ग्लोब कॅपिटल मार्केटिंग कंपनीत कुठलेही रजिस्ट्रेशन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या कंपनीकडे पैशाची मागणी केली असता कोकणे यांना फक्त ३ लाख ५४ हजार ८२८ रुपये परत देण्यात आले. त्यामुळे उरलेल्या २६ लाख ४५ हजार १७२ रुपयांची शशांक वडके आणि त्याची पत्नी प्रियांका वडके या दोघांनी फसवणूक केली असल्याची फिर्याद कोकणे याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या संदर्भात कोकणे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, सदर दांपत्याची ओळख त्यांच्या एका जवळच्या मित्राने करून दिली होती. तसेच या सर्व व्यवहारात त्यांचे दोन जवळचे मित्र देखील साक्षीदार होते. असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे कोकणे आणि त्यांचे तीन मित्र यांना या पकरणी अधिक माहिती असल्याने त्या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे समजले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,471
फसवणूक शेअर मार्केट संकेत कोकणे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.