Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासन निर्णय… वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आरटीओ चे आवाहन
प्रशासन

शासन निर्णय… वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आरटीओ चे आवाहन

सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जून्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि.१– वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वाहनांना नंबर प्लेट बसविण्याकरिता जिल्ह्यासाठी सेवा पुरवठादार एफटीएएचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बुकींग करिता https://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ आहे. तसेच, अधिकृत फिटमेंट सेंटर्सची यादी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. या संकेतस्थळावर नमूद एचएसआरपी उत्पादकांकडून अर्जदारांना अर्ज भरणे, शुल्क अदा करणे, आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे, अपॉईंटमेंट घेणे, अपॉईंटमेंटची तारीख बदलणे, सदर प्रक्रीयेबाबत अर्जदाराच्या तक्रारी नोंदवणे याकरिता स्वतंत्र पोर्टल विकसीत करण्यात येत आहे.

एचएसआरपी बुकींगकरिता वाहनाची अचूक व योग्य माहितीसह विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे. सदर प्रक्रियेत प्रत्यक्षात वाहनांवरील माहिती व अर्जात भरलेली माहिती यात तफावत आढळून आल्यास भरलेले शुल्क जप्त करण्यात येणार आहे. तसेच बुकींग करुन ९० दिवसांचे आत एचएसआरपी नंबर प्लेट प्रत्यक्षात वाहनांस न बसविल्यासदेखील जमा केलेले शुल्क जप्त होऊन एचएसआरपी नंबर प्लेटचे निंदणीकरण होणार आहे. केवळ अधिकृत एचएसआरपी उत्पादकांकडूनच बसविलेली एचएसआरपी नंबर प्लेटच अधिकृत मानली जाईल.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.

सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जून्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन अहिल्यानगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,432
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  लेखणीला विचारांची दिशा देणारे, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य…

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.