Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आढावा बैठक, जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
प्रशासन

आढावा बैठक, जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

संगमनेरमधील या गावांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि.४ – शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सालीमठ म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे प्रकल्पाचे काम सुरू झाल्याची माहिती देत कर्जत तालुक्यातील बेलवंडी येथील जुन्या गावठाणातील जागा सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि संस्थेने तेथील काम तातडीने सुरू करावे. याच बांभोरा उपकेंद्राच्या परिसरात १० मेगावॅट प्रकल्पासाठी ३० एकर जागा निश्चित करण्यात यावी. शासकीय सौर प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तांत्रिक अडचणी असल्याने वाकी आणि नायगाव येथील जागेला भेट देऊन प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने पाहणी करावी. राहाता तालुक्यातील केळवड येथील प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे. या ठिकाणी जागेची उपलब्धता लक्षात घेऊन ५ मेगावॅटपेक्षा अधिक वीज निर्मितीसाठी प्रयत्न करावे.

अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव प्रकल्पाचे काम सुरू करावे, त्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करावा. श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथील नागरिकांशी संवाद साधून काम सुरू करण्यात यावे. शेवगाव तालुक्यातील दहिगाव, शहर टाकळी परिसरात प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यात यावा. खापरेवडी, हकलापूर, राहाता, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, श्रीरामपूर सूतगिरणी परिसर, राहुरी तालुक्यातील वांबोरी, पारनेरमधील लोणी मावळा, जावळा, राळेगाव, नेवासा एमआयडीसी, संगमनेरमधील पेमगिरी, कोपरगाव तालुक्यात चास,आणि जामखेड तालुक्यातील राजुरी येथे देखील जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर खासगी जागेचा शोध घ्यावा, प्रशासनातर्फे समन्वय साधण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 780
आढावा बैठक सिद्धाराम सालीमठ सौर ऊर्जा प्रकल्प
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री…

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.