Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… संगमनेरच्या पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
महाराष्ट्र संवाद विशेष

धक्कादायक… संगमनेरच्या पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

दरम्यान पुणे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी संगमनेरमध्ये येताच परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/02/2025Updated:07/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी –
संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अण्णा उर्फ अनिल बादशहा गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे गेल्या दोन वर्षापासून पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकामध्ये कार्यरत होते.
गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. वारंवार त्यांना संपर्क करून देखील कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे कुटुंबियांकडूनही त्यांचा शोध सुरू होता. अखेर आज त्यांचा तपास लागला असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा समोर आलं आहे.
गुंजाळ यांनी आत्महत्या केलेल्या लोणावळ्यातील टायगर पॉईंट वर त्यांची क्रेटा गाडी सुद्धा आढळून आली आहे. या गाडीत एक डायरी सापडली असून या डायरीमध्ये गुंजाळ यांच्या आत्महत्येच कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या डायरीमध्ये गुंजाळ यांनी आत्महत्या पूर्वी काही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खडकी पोलिसांचे एक पथकही लोणावळा येथे रवाना झाले होते. पोलिसांनी गुंजाळ यांच्या मृतदेहासह टायगर पॉईंटवर आढळून आलेली त्यांची क्रेटा गाडी ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरविला.
लोणावळा पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधले जात आहे.
संगमनेरमधील खांडगावचे रहिवासी…
दरम्यान पुणे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी संगमनेरमध्ये येताच परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दुर्दैवी वृत्त समजतात त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 7,017
अण्णा गुंजाळ आत्महत्या पुणे पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.