Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, २३ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या राशिभविष्य

23/10/2026

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुलाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी केले बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर… वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रशासन

मुलाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी केले बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर… वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस, बनावट किंवा खोटे कागदपत्र सादर करण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १५ – 

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले.

याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले.

समितीने अर्जदार व त्यांच्या वडिलांना सुनावणीसाठी बोलावले असता, त्यांनी बनावट प्रमाणपत्र कोठून व कसे मिळाले याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच, अर्जदाराने सादर केलेले पुरावे खोटे असल्यास जबाबदारी त्यांची असेल, याची त्यांनी शपथपूर्वक कबुली दिली होती.

या प्रकरणी आनंद गंगाराम देवरे (रा. कोपरगाव, मूळ रा. जिल्हा धुळे) यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस, बनावट किंवा खोटे कागदपत्र सादर करण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,261
जात वैधता प्रमाणपत्र फसवणूक बनावट कागदपत्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, २३ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या राशिभविष्य

By Annant Ppangarkar23/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आज तुमचे मन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात अधिक गुंतलेले राहील. समाजात…

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.