Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरातील पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त, मुख्य कत्तलखान्यांचे काय?
प्रशासन

संगमनेर शहरातील पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त, मुख्य कत्तलखान्यांचे काय?

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्याबाबत माहिती मिळाली असता नऊ जणांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यात चार जणांनी कत्तलखाने बंद करून त्याचे रूपांतर घरात केले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनाधिकृतपणे सुरू असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांना पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे कत्तलखाने सुरूच असल्याने अखेर गुरुवारी सकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त केले.

पालिकेने पाच कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचे वृत्त समाधानकारक असले तरी मुख्य कत्तलखान्यांचे काय असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण शहरात अधिक कत्तलखाने असून काही ठराविक कत्तलखान्यांवरच कारवाई झाल्याचे दिसते. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू असून याची माहीती पोलीस व पालिका प्रशानला होती. यातील बहुतांशी कत्तलखान्यांवर पोलिसांनी वारंवार छापे देखील मारून कारवाया केल्या आहे. मात्र पोलीस तात्पुरती कारवाई करत असल्याने याचा फायदा हे कत्तलखाना चालक घेत होते. यामुळे शहरातील जमजम कॉलनी, मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डनच्या शेजारी पाच अवैध कत्तलखाने सुरू होते.

याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही संख्या वाढत राहिल्याने पालिकेने या सर्व अनाधिकृत कत्तलखाना मालकाला नोटीस बजावून हे काढुन घेण्यास सांगितले होते. हे अनाधिकृत कत्तलखाने सुरूच राहिल्याने अखेर नगर पालिका व पोलीस प्रशासनाने गुरुवारी (दि 20) संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.

गुरूवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अभियंता महेश गोर्डे आदिसह कर्मचारी जेसीबी, ट्रॅक्टर साहीत्य घेवून घटनास्थळी दाखल झाले. सोबत पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदिसह मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.

सकाळी १० वाजता मोहीम राबविण्यास सुरूवात केली. यावेळी काही कत्तलखाना चालकाने सुरुवातीला थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला पण पोलिस बळापुढे काहीच निभाव लागला नाही. सुमारे सहा तास ही कारवाई सुरू होती पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने सर्व अनाधिकृत कत्तलखाने उध्वस्त करण्याची कारवाई केली.

जमजम कॉलनी आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस माता रमाई गार्डनच्या शेजारी असलेले चार कत्तलखाने व रमाई गार्डनच्या शेजारील एक असे एकूण पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले आहे. यापुढे देखील अवैध कत्तलखान्याचा कारवाईचा बडगा सुरू राहणार असून कत्तलखान्यांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्याबाबत माहिती मिळाली असता नऊ जणांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यात चार जणांनी कत्तलखाने बंद करून त्याचे रूपांतर घरात केले होते. मात्र इतर पाच जणांचे कत्तलखाने सुरूच असल्याने संगमनेर नगरपालिका व प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत पाचही कत्तलखाने जमीनदोस्त केले. 

रामदास कोकरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,746
कत्तलखाना कारवाई रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.