Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन
प्रशासन

अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन

बोरगे व रणदिवे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोघांनाही अटक झाली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2025Updated:21/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २१ फेब्रुवारी – 

अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेले तसेच कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या अहिल्यानगर महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्या निलंबनाचे आदेश आज (२१ फेब्रुवारी) काढले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अत्यंत पातळीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज झाल्याचा ठपका आरोग्य सेवा संचालकांनी ठेवला होता. या संबंधितांनी महापालिकेला देखील कळविले होते. त्यानंतर आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावत कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु कामकाजात सुधारणा न झाल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

मनपा आयुक्त डांगे यांनी या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये आरोग्य विभागातील कामकाजाची चौकशी व तपासणी करण्यासाठी एक तीन सदस्यांची समिती नियुक्त केली होती. या डॉ. बोरगे यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासह विविध आक्षेप नोंदवत ठपका ठेवला होता.

समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये विजयकुमार रणदिवे व डॉ. अनिल बोरगे यांच्याविरुद्ध आर्थिक अपहारासह विविध प्रक्षेप नोंदवत ठपका ठेवण्यात आला होता. रणदिवे आणि बोरगे यांनी १६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केला. १५ लाखाची रक्कम रणदिवे यांच्या खात्यात जमा केली व पुन्हा प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये तीनदा पंधराव्या वित्त आयोगाच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केले त्यासाठी सक्षम प्राधिकार्‍याची मंजुरी घेतली नाही.

देयकातून सरकारी कपाती व ईपीएफ मधून कपात केलेल्या रकमांचा भरणा खात्यावर केला नाही. विविध योजनांचे लेखी व कॅशबुकमध्ये त्रुटी आढळून आल्या. पीसीपीएनडीटी, बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत परवाना देण्यामध्ये त्रुटी आढळल्या. सेवा हमी कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या सेवेत अनियमितता आढळून आली. 

आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसणे. कंत्राटी पदे भरतीमध्ये अनियमितता आढळून आली. असे अनेक ठपके समितीने डॉ. बोरगे यांच्यावर ठेवले होते. त्यामुळे बोरगे यांना नोटीस बजावून विचारलं करण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही खुलासा न केल्याने अपहाराच्या आरोपावरून बोरगे व रणदिवे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोघांनाही अटक झाली होती.

आयुक्तानी आपल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, बोरगे यांनी लोकसेवा म्हणून स्वतःच्या पदाचा अधिकाराचा गैरवापर करत गुन्हेगारीत स्वरूपाचे वर्तन केले. मनपा कर्मचाऱ्याने अशोभनीय गैरवर्तन केले. यामुळे मनापासून जनमानसातील प्रतिमा मलीन झाली. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ३ (एक), (दोन), (तीन), (एक) मधील तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरून तसेच मनपा अधिनियम कलम ५६ (दोन), (फ) मधील तरतुदीनुसार निलंबन करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,135
अनिल बोरगे अहिल्यानगर महानगरपालिका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. कामाच्या…

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.